Download App

राजीनाम्यानंतर अजितदादांची माफी का मागितली? निलेश लंकेंनी स्पष्टच सांगितलं

Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात (Lok Sabha Election) काल एक मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणू लढण्याची घोषणा केली. आता लंके शरद पवार गटाचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी राहिलं आहे. दरम्यान, शुक्रवारी सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी मतदारसंघातली जनता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची माफी मागितली होती. माफी का मागितली असा प्रश्न विचारला जात असतानाच स्वतः लंके यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

मोठी बातमी : निलेश लंकेंच्या हाती तुतारी ! आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात रिंगणात

पारनेरमधील सुपा येथे आमदार निलेश लंके यांनी काल कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. तसेच चार महिन्यापूर्वीच कटू निर्णय घ्यावा लागणार असे सांगत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार, असे त्यांनी घोषित केले. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा मेलद्वारे पाठविणार असल्याचे लंके यांनी जाहीर केले. ही घोषणा करताना लंके हे भावूक झाले होते.

इथल्या सर्वशक्तिमान पुढाऱ्यांना पराभूत करायचं असेल तर त्याआधी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. आमदारकीचा राजीनामा देताना खूप वेदना होत आहेत. जनतेनं मला माफ करावं, असे म्हणताना लंकेंच्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर त्यांनी अजित पवार यांचीही माफी मागितली. या माफीच्या कारणाचा खुलासा एका प्रसारमाध्यमाशी बोलताना लंके यांनी केला.

तुम्हाला 4 तारखेला कळेल खरा डॉन कोण? सुजय विखेंविरोधात लंके मैदानात

अजितदादांची दहा वेळा माफी मागितली. कारण, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना त्यांनी भरभरून दिलं. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो. जिल्ह्यातील काही कुटुंबांनी आम्हाला खूप त्रास दिला. आमची विकासकामे अडवली गेली, असे लंके म्हणाले.

follow us