Download App

Sujay Vikhe vs Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीआधीच दोघे आले आमनेसामने

Sujay Vikhe vs Nilesh Lanke : भाजप खासदार डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोघेही आतापासूनच एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करताना आमदार निलेश लंके यांनी थेट खासदार सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘विरोध सुरू केला तर शेवट करतो’, असे शब्द लंके यांनी खासदार विखेंसाठी वापरले. एकप्रकारे लंके यांनी खासदार विखेंना थेट लोकसभा लढविण्यासाठीच चॅलेंज दिले आहे.

निलेश लंकेचे दारही ईडीने ठोठावले होते…. पण अधिकाऱ्यांनाच….

‘तुम्ही सुसंस्कृत राजकारणी आहात.आम्ही पण सुसंस्कृत राजकारणी आहोत.आम्ही जशास तसे आहोत. हात जोडायची तयारी, पायी पडण्याची तयारी आहे. वेळप्रसंगी शर्टच्या बाह्या वर करण्याची आमची तयारी आहे. राजकारण सोयी-सोयीने चालवा. तुम्ही वाकडं पाऊल टाकलं, तर आम्ही दोन पावले वाकडे टाकू. आमची यंत्रणा रात्री बारानंतर सुरू होते. सगळे गाणे वाजणार आहे. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी आहे. विरोध सुरू केला तर शेवट करतो’, असे थेट चॅलेंज लंके यांनी खासदार विखेंना दिले आहे.

‘आता काही लोक‎ जिल्हा परिषदेने पूर्वी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन करत फिरत आहेत.सकाळी‎ उठल्यापासून माझ्या नावाचा जप करत आहेत’, असा टोलाही लंकेंनी विखेंना लगावला आहे.

https://letsupp.com/maharashtra/maharashtra-devendra-fadnavis-comment-on-shivani-wadettiwar-statement-on-sarvarkar-35091.html

पारनेर मतदारसंघातील रस्त्याच्या मंजुरीच्या कामावरून विखे व लंके यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर नगरच्या बाजार समितीमध्ये लंकेंनी थेट खासदार विखेंना डिवचले आहे. बाजार समितीच्या प्रचारासाठी भाजपचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात आता खासदार सुजय विखे लंके यांना उत्तर देतीलच. नगर बाजार समितीच्या निवडणुकीच्या आडून दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आता या मेळाव्यात खासदार विखे आमदार लंके यांनी दिलेल्या आव्हानाला कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us