Download App

Sharad Pawar : कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचा दाखला देत शरद पवारांनी फुंकलं संघर्षाचं रणशिंग!

Sharad Pawar News : ‘आज देशात चित्र बदलत आहे. काही शक्ती या देशाला पन्नास वर्षे मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती धर्माच्या माध्यमातून सामान्य माणसात संघर्ष कसा होईल याची खबरदारी घेत आहेत. या वर्गाविरुद्ध लढा देण्याचा काळ आता आला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारी करण्याचे आवाहन केले. शरद पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात भाजप सरकारविरोधात जोरदार संघर्ष करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला.

नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंहामंडळाच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले आदी उपस्थित होते.

NCP मोठा भाऊ : अजितदादांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात, आता डीएनए टेस्टची गरज!

पवार पुढे म्हणाले, आज देशातील चित्र बदलत आहे. जो राजकीय पक्ष ज्याच्या हातात आज देशाची सत्ता आहे. त्यांच्याकडून कष्टकरी कामगारांसाठी या सत्तेचा उपयोग होत नाही. नगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. त्यानंतर आम्ही पेपरमध्ये वाचले याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन तीन दिवस बाजारपेठ बंद. जातीजातीत अंतर वाढतंय. संघर्ष होतोय. हे काम काही शक्ती करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणं लढा देणं हे काम तुमच्या माझ्यासमोर आहे. हे जर केलं नाही तर हमाल कामगारांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. संघर्षाची तयारी आपण केली पाहिजे.

कर्नाटकात होऊ शकतं, अन्य राज्यात का नाही 

काल मी बंगळुरूला होतो. कर्नाटकात नवीन राज्य आलं. माणसांत विद्वेष वाढवायचे काम तेथील आधीच्या सरकारने केले. अनेकांना वाटत होते की या निवडणुकीत सत्ताधारी जिंकणार. पण सामान्य माणसांच राज्य आता तेथे आलं आहे. कालच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास एक लाख लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये 70 टक्के तरुण विविध जाती धर्मांचे होते. हे घडलं कशामुळे त्याचं कारण कष्टकरी माणसांची एकजूट. जर कर्नाटकात अशी एकजूट होऊ शकते तर अन्य राज्यात कशी होत नाही हे पाहण्याचा काळ आता आला आहे, अशा सूचक शब्दांत त्यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारीचे संकेत दिले.

Rs 2,000 Notes : ‘म्हणजे इतिहासाची संपूर्ण पुनरावृत्ती होईल!’ नोटबंदीच्या निर्णयावरून आव्हाडांची खोचक टीका

Tags

follow us