NCP मोठा भाऊ : अजितदादांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात, आता डीएनए टेस्टची गरज!
Sanjay Raut : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे गटाचे विधानसभेत संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी केला होता. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी हे वक्तव्य करून ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक संकेत दिले. दरम्यान, आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. आता सर्वांचे डीएनए टेस्ट करावे लागतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. (Sanjay Raut’s reaction On Ajit Pawar’s statement About NCP)
राऊत म्हणाले की, कोण लहान, कोण मोठा यासाठी एकदा आम्ही सगळ्यांची डीएनए टेस्ट करू. मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये देखील कोण लहान भाऊ मोठा भाऊ? हा विषय आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की, डीएन टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक जण, प्रत्येक आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही भूमिका मांडावी लागते, असं ते म्हणाले.
राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे 19 उमेदवार लोकसभेसाठी उभे राहतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून नाना पटोले यांनी राऊतांना आघाडीत अडचणी निर्माण करू नका, अशा शब्दात फटकारले होते. दरम्यान, आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, मागच्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे 19 खासदार होते. आमचा लोकसभेतला 19 चा आकडा कायम राहिल , कदाचित वाढेल सुद्धा. त्याच्यामध्ये कोणाला त्रास व्हायचं कारण नाही, असा चिमटा त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला काढला.
‘बंटीला बंटी म्हणू नका, बंटीला आता बंटी झाले’; अजितदादांनी घेतली सतेज पाटलांची फिरकी
काही दिवसाआधी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता संजय राऊत यांनी शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी निर्माण होण्याची शक्यता असल्यचां बोलल्या जात आहे.