Download App

“दशक्रियेला बोलवा, कावळ्याआधी मी हजर”; पराभवानंतर सुजय विखेंचा ट्रॅक बदलला

विकासकामांपेक्षा जनसंपर्कालाही महत्व देणारी माणसं आहेत. त्यामुळे दशक्रियेला बोलवा कावळ्याआधी मी हजर असेन

Sujay Vikhe : लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांचा (Sujay Vikhe) पराभव झाला. यामागे काय कारणं आहेत याचा शोध घेतला जात असतानाच सुजय विखे पाटील यांनी नुकतंच केलेलं खुमासदार भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. मी पराभावातून शिकलोय. आता दशक्रियाविधी, वाढदिवस, जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांना आधी हजर राहणार. विकासकामांपेक्षा जनसंपर्कालाही महत्व देणारी माणसं आहेत. त्यामुळे दशक्रियेला बोलवा कावळ्याआधी मी हजर असेन, अशी टोलेबाजी सुजय विखेंनी राहाता येथील एका कार्यक्रमात केली.

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखे-निलेश लंके राजकीय वैर खरंच संपलंय का?

सुजय विखे यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मागील पाच वर्षांत मला बराच अनुभव मिळाला आहे. मतदान आणि विकासकामांचा काहीच संबंध नाही. जितके रोहित्र दिले तितकाच करंट लोकं देतात असा माझा अनुभव आहे. वेळ बदलत आहे. विचारही बदलत आहेत, विचारधारा बदलत आहे. लोकांना नेमकं काय पाहिजे आहे हे दुर्दैवाने मला माहित नव्हतं. आताही ते मला ठाऊक नाही. ज्या लोकांनी साथ दिली त्यांना सोबत घ्यावच लागणार आहे अन्यथा त्यांचं संरक्षण करणारं कुणीच नसेल असे विखे यांनी स्पष्ट केले.

मागच्या ५ वर्षात माझा असा अनुभव राहिला आहे की, विकासकामांचा आणि मतदानाचा काहीच संबंध राहिलेला नाही. आता काळ बदलत आहे, विचार बदलत आहे. पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन चालत आहे. जे आपले आहे त्यांना धरून पुढे चालायचं आहे. आज कुणीच कोणावर विश्वास ठेवत नाही. जर एखादा चांगला काम करणाऱ्या सरपंचाचा पराभव झाला तर त्याचं नुकसान होत नाही मात्र गावाचं नुकसान होतं. मात्र जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

माझ्या सोबत असे अनेक लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणात आले होते मी त्यांना सांगत होतो तुम्ही जितके कष्ट घेणार त्यापेक्षा जास्त लोक तुमच्या पराभवासाठी समोर येणार पण हे मी विसरून गेलो की त्यांच्या पराभवानंतर ही अक्कल मला का आली नाही. मी सल्ले देत गेलो मात्र त्याची अंवलबजावणी मला करता आली नाही हे माझं दुःख आहे.

लोकसभेला सुजय विखेंना मदत केली का? आमदार सत्यजित तांबेंचं बेधडक उत्तर

जेव्हा आपण राजकारणात लढतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की समाजाला या गोष्टीचा त्रास होत असेल म्हणून आपण त्याच्या विरोधात उभं राहतो मात्र निवडणुकीनंतर असं समजतो की ती गोष्ट समाजालाच मान्य आहे. त्यामुळे आपण त्याचा विरोध का करावा हे निवडणूक झाल्यानंतर कळतं. मात्र यामध्ये आपल्याला शिकण्यासाठी खूप काही मिळालं. राजकारणात पदं येतात जातात. कुणी खासदार होतो कुणी होत नाही मात्र माझी सर्वांना एक विनंती आहे बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून तुम्ही सावध राहा, असं आवाहन सुजय विखेंनी केले.

 

follow us