Download App

Maharashtra Cabinet Expansion : कोणतं खातं मिळणार? धनंजय मुंडे बोलले पण..

Dhananjay Munde On Cabinet Expansion : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. या रखडलेल्या विस्तारावर आज मंत्री धनंजय मुंडे यांनीही भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत माहिती माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत यावर कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.

धनंजय मुंडे हे आज आपल्या मतदारसंघात म्हणजेच परळीत जाणार आहेत. मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीमध्ये तयारी करण्यात आली आहे दरम्यान परळीत जाण्यापूर्वी मुंडे हे नगरमधील शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट : भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे गौप्यस्फोट

परळी मध्ये धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी मोठमोठे फलक हे कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. या फलकावर गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे फोटो आहेत. यावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की राज्यात नव्याने महायुतीचे सरकार आले आहे. यामध्ये भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच राष्ट्रवादी यांचा समावेश आहे. स्वाभाविक आहे तिन्ही पक्षातील मान्यवर नेत्यांची चित्रे ही पोस्टरवर दिसतील.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर धनंजय मुंडे यांनी मला याबाबत काही माहिती दिली नसून याबद्दलची माहिती मुंबईतूनच मिळेल असे सांगत याबाबत अधिक बोलणे टाळले.

Vijay Vadettiwar : फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते, पाहू त्यांचं किती काळ जमतं

परळी आणि बीड जिल्ह्याने माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. अनेक संकटाच्या काळात तेथील जनता माझ्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यांच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळेच मी या संकटावर मात करू शकलो. आजही त्यांच्याच आशिर्वादाने सरकारमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड आणि परळीत जात आहे.

Tags

follow us