Download App

आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणारे दोघे गजाआड; उद्या शेवगाव बंदची हाक

Ahmednagar News : सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले.  या घटनेने तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. शेवगाव पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (सोमवार) शेवगाव बंद पुकारला आहे.

वाचा : Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान हादरलं; 9 पोलीस ठार

शेवगाव शहरातील दोन समाजकंटकांनी शनिवारी दुपारी आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला. या घटनेची माहिती होताच नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली. या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही युवक रस्त्यावर उतरले. या प्रकाराची माहिती होताच शेवगाव, पाथर्डी, नेवासा, सोनई येथील पोलीस पथकासाह प्रभारी पोलिस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके शेवगावला दाखल झाले. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

३ लाख जणांचा मृत्यू, हजारो लोकांचा पत्ताच नाही; Russia Ukraine युद्धाच्या एका वर्षानंतर काय आहे परिस्थिती?

रविवारी या घटनेची माहिती मिळताच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार शहर बंदची हाक देण्यात आली असून आक्षेपार्ह मजकूर पसरविण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्यास त्वरीत अटक करावी अशी मागणी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी आधाट यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट दिसल्यावर शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांच्या नेतृत्वात शनिवारी (दि.११) रात्री उशिरा शेवगावमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Tags

follow us