Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान हादरलं; 9 पोलीस ठार

  • Written By: Published:
Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान हादरलं; 9 पोलीस ठार

भारताचा शेजारी देश पाकिस्तानात मोठा आत्मघाती हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत पोलिसांना लक्ष करण्यात आले असून, या भीषण घटनेत ९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

हल्लेखोराने सोमवारी पोलिसांच्या गाडीला धडक दिली. यानंतर झालेल्या भीषण स्फोटात ९ पोलिसांचा मृत्यू झाला. बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटापासून साधारण 160 किमी अंतरावर असेलल्या सिब्बी शहरात हा भीषण हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाचे प्रवक्ते महमूद खान नोतिजा यांनी सांगितले.

आम्ही हेरलं म्हणून चोरलं, ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

पोलीस व्हॅनमधील सर्व अधिकारी ड्युटी संपवून घरी परतत असताना हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेत सात पोलीस जखमी झाले आहेत.

दरम्यान, अद्यापपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नसून, गेल्या महिन्यात कराचीमध्ये सैन्याच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला होता. यावेळी झालेल्या चकमकीत टीटीपीच्या पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर, चार पोलिसांचा यामध्ये मृत्यू झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यात कराचीमध्ये सैन्याच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये 4 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, 15 हून अधिकजण जखमी झाले होते. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

दहशतवाद्यांकडून ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला होता. तेथे कराची भागातील आयजी आणि त्यांचा कर्मचारी वर्ग बसतो. याशिवाय काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पेशावरमधील पोलीसलाईन जवळ असलेल्या मशिदीत आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते.

नमाजदरम्यान करण्यात आलेल्या या हल्ल्यात हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानामधील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा घटनांमध्ये सामान्यांना नाहक बळी बनवले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube