Ahmednagar Radhakrishna Vikhe : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आधी होणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर नेते आमनेसामने आले आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) संघर्ष पुन्हा दिसू लागला आहे.
या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले आहेत. या पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दोन्हीही नेत्यांनी प्रचारात उडी घेतली आहे. मंत्री विखे यांनी थोरात यांच्या संगमनेरात प्रचार सभा घेत थोरातांचा चांगलाच समाचार घेतला.
Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला
विखे म्हणाले, ‘गेल्या 64 वर्षांपासून संगमनेर बाजार समितीवर तुमची (बाळासाहेब थोरात) सत्ता आहे. या 64 वर्षात समितीत काय बदल केला ?, शेतकऱ्यांसाठी काय केलं ?, असा सवाल करतु तुम्ही काय केलं ते सांगा ?, मी राहत्यात काय केलं ते सांगतो ?. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा व्हिडीओ का नाही बनवला ?’, कायम सोयीचे राजकारण करत असल्याची टीका विखे यांनी काँग्रेस नेते थोरात यांच्यावर केली.
ते पुढे म्हणाले, ‘महसूलमंत्रीपद अनेक वर्षे थोरात यांच्याकडे होते. मग मंत्रीपद असताना नगर जिल्ह्यात काय केले ?’, असा सवाल विखेंनी विचारला. ‘बाजार समितीची ही निवडणूक कुणा व्यक्तिविरोधात नाही तर प्रवृत्तीविरोधात आहे. त्यामुळे संगमनेरची बाजार समिती दलालांच्या तावडीतून काढून शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यायची आहे’, असे विखे म्हणाले.
अजितदादांसाठी चंद्रकांतदादांची धावाधाव पण…
विखे थोरातांना उद्देशून म्हणाले, तालुका काय तुमची जहागीर आहे का ?, तालुक्यावर तुमचे नाव आहे का ?, ज्यावेळी महसूलमंत्री तुमच्या तालुक्यात होते, तुम्हाला वाळू कमी किंमतीत मिळाली का ?, आज आम्ही 800 रुपये वाळू घरपोच देत आहोत. आपण सात वर्षे महसूलमंत्री होतात. माफियाराज का नाही संपवले ?, बाजार समितीवर एक कोटी रुपयांचे कर्ज आहे, याचे उत्तर द्या, असा प्रश्न विखेंनी विचारला.