अजितदादांसाठी चंद्रकांतदादांची धावाधाव पण…

अजितदादांसाठी चंद्रकांतदादांची धावाधाव पण…

Chandrakant Patil And Ajit Pawar :  गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होत आहे. पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगत असल्याने राजकीय मंडळी त्यांना चिमटे काढत आहेत.

दरम्यान, भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील मी अजितदादांसाठी धावत पळत आलोय ते कुठे गायब झाले?, असे म्हणत अजित पवारांना चिमटा काढलाय. ते पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे कालवा बैठकीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आज (26 एप्रिल) पुण्यातील शासकीय विश्रामगृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाटील हे या बैठकीला आले. मात्र, गाडीतून उतरताच त्यांनी तेथील उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले “अजितदादा आलेत का? दादासाठी मी धावत पळत आलो आहे आज ते कुठे गायब झाले..?” , चंद्रकांत पाटील गमतीने जरी म्हटले असले तरी त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असून ते मुख्यमंत्री देखील होतील अशाही चर्चा रंगत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यातील विविध शहरांमध्ये बॅनरही झळकत आहेत. मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांबद्दल अधिक संभ्रम निर्माण केला जात आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांसोबतच शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून देखील अजित पवार हे भाजप किंवा शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत केले जाईल तर अजित पवारांनी दिलेल स्पष्टीकरण हे पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्यासही काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. तर, त्यांनी आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर माजी आमदार विजय शिवतारे यांनी दिली होती. यामुळे अजित पवार खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का? या चर्चा रंगत आहेत.

राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !

काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुढील विधानसभा निवडणुका लढू असं म्हटलं आहे. मात्र, अजित पवार मुख्यमंत्री होतील या चर्चा थांबायचं काही नाव घेत नाहीत त्यातच चंद्रकांत पाटील किंवा अन्य नेत्यांची संभ्रमात टाकणारी वक्तव्य त्यास अधिक बळकटी देत आहेत.

त्यामुळे सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल केव्हा येतो आणि राज्यातील पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या बैठीकीची वेळ बदलल्याने अजित पवार हे आपल्या नियोजित कामासाठी पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या उपस्थितीतच ही बैठक सुरु झाली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube