राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !

राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !

Gulabrao Patil on Rahul Gandhi : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनीच खुलासा करत आपण कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या खुलाशानंतरही अधूनमधून चर्चा कानावर येतच असतात. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस विरोधात संघर्ष केला. राहुल गांधी यांनी हातात भगवा झेंडा घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रसेसोबत युती करण्यास तयार आहोत, असे पाटील म्हणाले.

Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं

त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील नेहमीच ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करत असतात. त्यांच्या याआधीच्या वक्तव्यांनीही अनेक वेळा वाद निर्माण केला आहे. मात्र, त्यांनी आपल्या वक्तव्यांपासून माघार घेतलेली नाही. आता मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे पद राहणार की नाही अशीच शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांची वक्तव्येही नरमाईची येत आहेत. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.  पाटील यांनी खोचक शब्दांत ही टीका केली असली तरी त्याचे दुसरे अर्थही काढले जात आहेत.

Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला

मंत्रिपदाचा सट्टा लावून शिंदेंबरोबर गेलो 

शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. अगदी मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला, असे मंत्री पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, त्यांच्या या वक्तव्यावर तेव्हा विरोधकांनी सडकून टीका केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube