Download App

महसूलमंत्री विखे अडचणीत ! शेतकरी मंडळाने केली तक्रार दाखल; वाचा, काय घडलं ?

Radhakrishna Vikhe : जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. नेते मंडळींचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप शेतकरी विकास मंडळाने केला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे.

संगमनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपल्यानंतरही विखेंकडून बैठकांचा आयोजन करण्यात आले असून या बैठकांच्या आडून प्रचार करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्राजक्त तनपुरेंवर सुजय विखेंचा हल्लाबोल, ‘एकदाही कारखाना नफ्यात चालवला नाही’

संगमनेर बाजार समितीसाठी उद्या मतदान होत आहे. समितीत एकूण 18 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. येथे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे.

बाजार समितीचा प्रचार संपल्यानंतरही विखे यांच्याकडून बैठका घेण्यात आल्या. विशेष म्हणजे शासकीय बैठकांच्या आडून हे करण्यात आले. त्यामुळे या प्रकारा विरोधात शेतकरी विकास मंडळाने तक्रार दाखल केली आहे.

Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा

महसूलमंत्री विखेंनी निवडणुकीचा प्रचार संपला तरी संगमनेर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी शासकीय बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनाही बोलावले आहे. हा प्रकार म्हणजे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप सभापती शंकर हनुमंता खेमनर, उमेदवार विजय विठ्ठल सातपुते यांनी केला आहे.

सात समित्यांसाठी उद्या मतदान

जिल्ह्यातील नगर, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी उद्या (28 एप्रिल) मतदान होत आहे. 29 एप्रिल रोजी शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. राहुरी बाजार समितीतील मतदानाची मात्र लगेचच मतमोजणी होणार आहे. तर अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगावा, राहाता, नेवासा आणि जामखेड या बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Tags

follow us