प्राजक्त तनपुरेंवर सुजय विखेंचा हल्लाबोल, ‘एकदाही कारखाना नफ्यात चालवला नाही’
Sujay Vikhe on Prajakta Tanpure : मागील तीन वर्षाच्या सत्तेच्या काळात तत्कालीन राज्यमंत्र्यांनी आपल्या खात्या मार्फत साधी एक डीपी बसवली नाही ते आम्हाला विकास काय हे विचारात आहेत हे विशेष, अशा संधीसाधू नेत्याला काय म्हणावे असा सवाल केला. आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करताना त्यांनी एकदाही कारखाना कसा आणि किती नफ्यात चालवला हे पहिले नाही हे विशेष, असा हल्लाबोल सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केला.
बाजार समितीच्या माध्यमातून विरोधकांनी मागील काळात केलेली लूट थांबवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम राहुरी तालुका विकास मंडळाच्या उमेदवार करतील असा विश्वास खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त करून या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्रिपदावरुन भांडण; शिवसेनेचा मविआवर निशाणा
विरोधकांनी बाजार समितीचा सभापती, उपसभापती, सचिव असे सर्व काही ठरविले असून पाच कोटी कसे लुटायचे याचा आराखडा देखील त्यांनी ठरविला असल्याचे सुजय विखे यांनी सांगताना हे सर्व बदलण्यासाठी विकास मंडळाच्या उमेदवाराना आपण संधी द्या असे आवाहन केले.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आपला नाकर्त्येपणा झाकण्यासाठी सातत्याने कधी भ्रष्टाचार, तर कधी विकास कामे यावर विरोधक हे बोलत आहेत, मात्र या सर्वांस आपण मोठमोठी प्रकल्प तसेच विकास कामे करून वेळोवेळी उत्तर दिले असल्याचे खा. विखे यांनी सांगताना तालुक्यातील ३२ गावात साडेतीन कोटी रुपयाचा निधी केवळ नऊ महिन्यात दिल्याचे सांगितले.