Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक येत्या काळात होणार असल्याने आता राजकीय (Shirdi Lok Sabha Election) पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची याद्या जाहीर करण्यात येत आहे. नुकतेच शिवसेना पक्षाने आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शिर्डीचा देखील समावेश असून शिर्डीतून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या उमेदवारीबरोबरच शिर्डीतील लढत ठरली आहे. या मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याचं उत्तर निकालावेळी मिळेल. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी सदाशिव लोखंडे यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते.
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता राजकीय पक्षांकडून देखील हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा होती. मतदारसंघामध्ये लोखंडे यांच्यावर असलेली नाराजी पाहता ही जागा शिवसेना लढवणार की महायुतीतील इतर पक्ष या ठिकाणी उमेदवार देणार अशी चर्चा सुरू होती.
Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग
मात्र गेले दोन टर्म शिवसेनेचा खासदार याच ठिकाणी निवडून आला असल्याने शिवसेना या जागेसाठी पहिल्यापासूनच आग्रही होती. खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांनाच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीबरोबरच आता शिर्डी मतदारसंघांमध्ये सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे असा सामना रंगणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांच्याविषयी मतदारसंघांमध्ये जनतेची नाराजी होती. लोखंडे यांच्या उमेदवारीला स्वपक्षातून देखील विरोध होऊ लागला होता. यामुळे या जागेवर भाजपकडून देखील चाचपणी सुरू होती. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डीमध्ये शिवसेना उमेदवार देणार हे देखील निश्चित मानले जात होते. यातच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी लोखंडे यांच्यावर विश्वास टाकत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
CM शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर; खासदार तुमानेंचा पत्ता कट, कोल्हापुरात पुन्हा मंडलिकच