Download App

Sujay Vikhe : पंकजा मुंडेंना ‘BRS’ ची ऑफर; विखे म्हणाले, मुंडे भाजपात…

Sujay Vikhe : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून मुख्यमंत्री करण्याची ऑफर आल्यानंतर राज्यातील राजकारण चर्चा सुरू झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

विखे म्हणाले, पंकजा मुंडे मोठे नेतृत्व आहेत. अशा नेत्यांसाठी अन्य पक्षांना नेहमीच हेवा वाटत असतो. अशा नेत्या आमच्या पक्षात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. पंकजा मुंडेंना कितीही ऑफर आल्या तरी त्या भारतीय जनता पार्टीतच राहतील. त्या कुठेही जाणार नाहीत. पक्ष बळकट करण्यासाठी मुंडे काम करत राहतील, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही याआधी प्रतिक्रिया दिली होती. बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाई करत आहे. मात्र महाराष्ट्रात काय आता तेलंगणात देखील बीआरएसचा मुख्यमंत्री होणे कठीण आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. त्यामुळे त्या अशा कोणत्याही ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले होते.

दानवेंनीही दिली प्रतिक्रिया

याआधी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडे खरेच बीआरएसमध्ये प्रवेश करतील का, किंवा त्यांच्या बीआरएसमधील प्रवेशाने या पक्षाची राज्यातील स्थिती सुधारेल का, असे प्रश्न दानवेंना विचारण्यात आले होते. त्यावर दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपात आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु, एखादं पद मिळालं नाही म्हणून नेतृत्व नाही असं कुणी सांगितलंय असा सवाल दानवे यांनी केला.

श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे…; नागरिकांचा आक्रमक पवित्रा

Tags

follow us