भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!

भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!

KCR पंढरपूर : बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे इतर पक्षांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेस म्हणते आम्ही भाजपची बी टीम आहे. भाजप म्हणते आम्ही काँग्रेसची ए टीम आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बीआरएस कोणत्याही पक्षाची टीम नाही. तर बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, असे म्हणतं तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते आज सरकोली, तालुका पंढरपूर येथे भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलत होते. (Chief minister Telangana KCR in Pandharpur said we are team of Farmers)

काय म्हणाले चंद्रशेखर राव?

महाराष्ट्रातील राजकारणी मला म्हणतात, इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करू नका. मला हे समजत नाही, आम्ही आत्ता कुठे महाराष्ट्रात सुरूवात केली. पण महाराष्ट्रातील या सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? एवढ्या छोट्या पक्षासाठी एवढा गोंधळ का घालत आहात? बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे इतर पक्षांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेस म्हणते आम्ही भाजपची बी टीम आहे. भाजप म्हणते आम्ही काँग्रेसची ए टीम आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बीआरएस कोणत्याही पक्षाची टीम नाही. तर बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे.

Bhagirath Bhalke : मोहोळच्या पोपटाला, भालके काय चीज ते उद्यापासून दाखवतो…!

महाराष्ट्रातील इतर पक्षांचे नेते म्हणतात विकास झाला. पण मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. तिथं 8 दिवसांमधून एकदा पाणी येते. अकोल्यात प्रकाश पोहरे माझे मित्र आहेत, ते म्हणाले 10 दिवसांनंतर पाणी येतं. सोलापूरमध्ये 8 दिवसांनंतर पाणी येतं. मग कसा विकास झाला? महाराष्ट्रात वीज कंपन्यांचे खासगीकरण का केले? पण खाजगीकरणानंतरही शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही?महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विमा योजना का नाही? आम्ही शेतकऱ्यांनी विमा योजना दिली, महाराष्ट्रात शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. राजकीय पक्ष येतील आणि जातील, असेही केसीआर म्हणाले.

‘वर्षा बंगल्यावरून हातोडे मारण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव..’ शाखा कारवाईवर राऊत भडकले!

बीआरएस तेलंगणापुरता मर्यादित नाही :

भारत राष्ट्र समिती हा तेलंगणापुरता मर्यादित पक्ष असल्याची टीका केली जाते. पण आमचा पक्ष तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. बीआरएस राष्ट्रीय पातळीवर विस्तारलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात म्हणतात, तिकडच्या योजना इकडे राबविल्या तर इकडे महाराष्ट्राचं दिवाळं निघेल. हो मी पण मानतो या गोष्टीला. दिवाळं निघेल. पण तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्रात दिल्यास इथल्या नेत्यांचं निश्चीत दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल. तेलंगणाच्या योजना महाराष्ट्रात लागू केल्यास दौरे थांबवीन, असे त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube