Download App

भारतात फक्त छत्रपती संभाजीराजांचाच उदो उदो होईल; फडणवीसांनी ठणकावले!

Devendra Fadanvis : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar)करण्यात आले. या निर्णयाविरोधात सध्या जोरात राजकारण सुरू आहे. या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषणही केले आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस शनिवारी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  उपस्थित होते.

वाचा : Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष

फडणवीस म्हणाले, की मी आंदोलकांना निवेदन करतो की त्यांनी आपले आंदोलन परत घ्यावे. कारण या संदर्भात एक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. शेवटी या भारतात फक्त छत्रपती संभाजी राजांचाच उदो उदो होईल. इथे औरंगजेबाचा उदो होऊ शकत नाही. शांतता राहण्यासाठी जे काही प्रयत्न आम्हाला करता येतील ते आम्ही करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 Dharashiv : संभाजीनगरनंतर धाराशिवमध्येही MIM आक्रमक, नामांतरावरून वाद पेटणार?

नामांतराच्या मुद्द्यावर आता वाद-विवाद वाढतच चालला आहे. या नामांतराविरोधात एमआयम आक्रमक आहे. फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानबादचे नाव धाराशिव केल्याचा निर्णयही त्यांना पटलेला दिसत नाही. त्यामुळे या मुद्द्यावरही वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे ठाकरे गटाच्या नेत्यांनीही स्वागत केले आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही काही दिवसांपूर्वी एमआयएमवर  जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली होती.

नामांतराच्या विरोधात की बाजूने आहात ते सांगा : जलील

छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने नामांतराचा विषय मार्गी लावावा, शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पत्र शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नामांतराच्या विरोधात की नामांतराच्या बाजूने याबाबत स्पष्ट भूमिका उद्योजकांनी घ्यावी, उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत, असे जलील म्हणाले.

 

Tags

follow us