Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष

  • Written By: Published:
Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष

सभागृहात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्रास देऊ नये, म्हणून मी तुमच्यावर जास्त लक्ष ठेवतो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सभागृहात लगावला. देवेंद्र फडणवीस आज विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना टोले लगावले.

एकनाथ खडसे यांना टोला लागवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यपालांच्या भाषणात फुले, शाहू, आंबडेकर यांचा उल्लेख नव्हता, असा आरोप एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये केला. पण भाषणाच्या दिवशी खडसे सभागृहात उशिरा आले होते. त्यामुळे त्यांनी भाषण ऐकलंच नाही.”

हेही वाचा : Old Pension Scheme : राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करावा, घोषणा करून निवडणुका जिंकता येतील पण…

त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा माझ्यावर लक्ष असत का ? असा प्रश्न विचारला त्यावर, सभागृहात माझं तुमच्यावर लक्ष असतं. त्यात आज तुम्ही गटनेते झालात त्यामुळे आता अजून जास्त लक्ष ठेवावं लागेल. त्याहीपेक्षा सभागृहात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्रास देऊ नये, म्हणून मी तुमच्यावर जास्त लक्ष ठेवतो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सभागृहात लगावला.

त्यांना वाचायची गरजच नाही

आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना आणखी टोले लगावले ते म्हणाले की, खडसे एकतर सभागृहात उशिरा आले, त्यामुळे त्यांनी भाषण ऐकलं नाही आणि त्यांनी भाषण वाचलंही नाही. कारण ते इतके अनुभवी आहेत कि त्यांना वाचायची गरजच पडत नाही. यावेळी फडणवीसांनी राज्यपालांच्या भाषणाची सुरुवात वाचून दाखवत खडसे यांना सांगितलं कि राज्यपालांच्या भाषणाची सुरुवातच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचे होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube