Old Pension Scheme : राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करावा, घोषणा करून निवडणुका जिंकता येतील पण…

  • Written By: Published:
Old Pension Scheme : राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करावा, घोषणा करून निवडणुका जिंकता येतील पण…

काही राज्यांनी जुनी पेन्शन लागू केली. आज आपण जरी योजना लागू केली तर आता याचा फरक पडत नाही पण याचा ताण २०३० नंतर येईल. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी योजना लागू करता येईल पण राज्यकर्ता म्हणून योग्य विचार केला पाहिजे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जुन्या पेन्शन योजनेवर विधानपरिषदमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की नोव्हेंबर २००५ मध्ये आपल्या राज्यात नवी पेन्शन योजना आली. त्याच कारण म्हणजे त्यावेळी वेतन आयोग लागू झाल्यामुळे राज्याची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे जाणीवपूर्वक नव्या पेन्शन योजनेत जाण्याचा निर्णय घेतला. जगातील सर्वच प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये हीच पेन्शन योजना आहे.

हेही वाचा : Bhaskar Jadhav : आज माझ्यावर राग कमी दिसतोय; नार्वेकरांना उद्देशून जाधवांचे विधान

जुन्या पेन्शन योजनेमध्ये पगाराच्या ५० टक्के पेन्शन मिळायची. नव्या पेन्शन योजनेनुसार पहिल्यांदा कर्मचारी १० आणि सरकार १० टक्के जमा करायचे आणि तो फंड गुंतवायचा. त्यातुन जमा झालेल्या पैशाच्या ६० टक्के रक्कम एकत्र आणि उरलेली रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते. त्यामुळे नवीन पेन्शन योजना आणायची असेल तर सिस्टीम तयार करावी लागेल. गुंतवणुकीचे पर्याय शोधावे लागतील.

निवडणुका जिंकता येतील पण…

काही राज्यांनी जुनी पेन्शन लागू केली. आज आपण जरी योजना लागू केली तर आता याचा फरक पडत नाही पण याचा ताण २०३० नंतर येईल. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी योजना लागू करता येईल पण राज्यकर्ता म्हणून योग्य विचार केला पाहिजे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की घोषणा करून निवडणुका जिंकता येतील पण तसे करता येत नाही. जी इतर राज्य सरकारे जी घोषणा करतात त्यांना हे माहिती आहे की याचा ताण येणाऱ्या सरकारला पडेल.

घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही

आपल्या भाषणाच्या शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जुनी पेन्शन योजना लागू करण्यास कोणतीही हरकत नाही, परंतु हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेण्याची सरकारची तयारी आहे. जुन्या योजनेबाबत सरकार नकारात्मक नाही, राज्यात प्रत्येकाचे कल्याण आपल्याला बघायचे आहे. पेन्शन आणि पगाराचा समतोल राखला पाहिजे.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube