Bhaskar Jadhav : आज माझ्यावर राग कमी दिसतोय; नार्वेकरांना उद्देशून जाधवांचे विधान

Bhaskar Jadhav : आज माझ्यावर राग कमी दिसतोय; नार्वेकरांना उद्देशून जाधवांचे विधान

Bhaskar Jadhav On Rahul Narwekar :  महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. असे वातावरण सभागृहात असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav )  हे आज वेगळ्या मुडमध्ये पहायला मिळाले. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एक गोष्ट लक्षात आणुन दिली.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे आपल्या घणाघाती भाषणांसाठी ओळखले जातात. विधानसभा असूदे किंवा जाहीर सभा, भास्कर जाधव हे आपल्या विरोधकांवर कडाडून टीका करत असतात. अनेकवेळा ते बोलताना विरोधी नेत्याची नक्कल देखील करतात. आज मात्र त्यांनी चक्क विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एक गोष्ट लक्षात आणुन दिली आहे.

भास्कर जाधव हे ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांना सभागृहाच्या कामकाजाची माहिती आहे. अनेकवेळा ते विधानसभेतील नियमांच्या पालनाबद्दल आग्रही असल्याचे पहायला मिळते. आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली. विधानसभा अध्यक्ष आपल्या खुर्चीवर बसताना आपल्या उजव्या हाताच्या बाजुने व विधासभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या डाव्या बाजूने खुर्चीत बसत असतात. याउलट विधानपरिषदेमध्ये अध्यक्ष खुर्चीवर बसताना आपल्या डाव्या हाताच्या बाजुने व खुर्चीच्या उजव्या बाजूने बसतात. कळत-नकळतपणे आपल्याकडून चूक झाली असेल, पण विधानसभेचे कामकाज योग्य रितीने व्हावे असे मला वाटते, असे म्हणत जाधवांनी नार्वेकरांच्या ही गोष्ट लक्षात आणुन दिली.

ही गोष्ट मी आपल्याला सांगण्यासाठी तीन वेळा आपल्या दालनात आलो होते. पण आपण बैठकीमध्ये होतात. आज आपला मुड चांगला दिसतोय. माझ्यावर आज कमी रागात दिसताय, अशी मिश्किल टिप्पणी देखील भास्कर जाधव यांनी केली आहे. तसेच माझे काही चुकले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, असेही जाधव म्हणाले आहेत.

Horror Film Festival : मुंबईकरांची दातखिळी बसणार, आजपासून रंगणार हॉरर फिल्म फेस्टिवल

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील तितकेच खुमासादर उत्तर दिले आहे. भास्कर जाधव यांनी माझा मुड बघुन जी गोष्ट माझ्या लक्षात आणुन दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. याबाबत कोणताही नियम नसला तरी प्रथेप्रमाणे ही गोष्ट असेल तर त्याची माहिती घेतली जाईल, असे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube