HSC Paper Leak Case : बारावीचा पेपर फोडणाऱ्या संस्थेच्या संचालकाला अखेर बेड्या

Ahmednagar News :  मुंबई येथे बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या साह्याने वेळेच्या आधीच फोडण्यात आला होता. या घटनेचा तपास करत मुंबई पोलिसांनी नगर (Ahmednagar) तालुक्यातील रुईछत्तीशी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच जणांना गजाआड केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थेचे संचालक अक्षय बाळासाहेब भांबरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]

Hsc Paper Leak

Hsc Paper Leak

Ahmednagar News :  मुंबई येथे बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या साह्याने वेळेच्या आधीच फोडण्यात आला होता. या घटनेचा तपास करत मुंबई पोलिसांनी नगर (Ahmednagar) तालुक्यातील रुईछत्तीशी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच जणांना गजाआड केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थेचे संचालक अक्षय बाळासाहेब भांबरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पेपर फुटीच्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणचे धागेदोरे नगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुईछत्तीसी या गावापर्यंत येऊन पोहोचले. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करत या प्रकरणात काही जणांना अटक केली आहे.

वाचा : HSC Paper Leak Case : पेपर फुटीचे धागेदोरे नगरपर्यंत, ‘या’ महाविद्यालयाच्या प्राचार्यासह शिक्षकांना बेड्या

मुंबईतील दादर परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात बारावीचा पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर मोबाइल आढळून आला होता. या मोबाइलमध्ये सोशल मीडियावर बारावीचा पेपर आधीच फोडल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रुईछत्तीशीतील भांबरे महाविद्यालयातील प्राचार्य, दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संचालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या सातवर

119 विद्यार्थ्यांना आधीच मिळाले गणिताचे पेपर

भांबरे महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. महाविद्यालयात बारावीचे 337 विद्यार्थी होते त्यापैकी 119 विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपर आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. या तपासातून आणखी काय माहिती बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version