‘मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं, आधी निवडून तर या’; भुजबळांचं राऊतांना उत्तर

Chagan Bhujbal replies Sanjay Raut : मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील, अशा शब्दांत आव्हान देणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मोजक्याच पण अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भुजबळ यांच्या मतदारसंघ येवल्यात जाहीर सभा घेतली. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (93)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (93)

Chagan Bhujbal replies Sanjay Raut : मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील, अशा शब्दांत आव्हान देणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मोजक्याच पण अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भुजबळ यांच्या मतदारसंघ येवल्यात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भुजबळांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर पवारांना उत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना उत्तरे तर दिलीच शिवाय संजय राऊत यांनाही खेडबोल सुनावले.

साहेब, कोल्हापूर ते गोंदिया कुठे कुठे माफी मागणार? भुजबळांचा पवारांना सवाल

राऊत यांनी काल पंढरपुरात छगन भुजबळ यांना आगामी निवडणुकीत पराभूत करणार असल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर भुजबळ म्हणाले, मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं. कुठं काय बोलता आधी तुम्ही निवडून तर या असे प्रतिआव्हान राऊत यांना दिले.

काय म्हणाले होते राऊत ?

‘मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील. आम्ही मुंबईत त्यांचा पराभव घडवून दाखवला आहे. नाशिकला लोकसभेत त्यांचा पराभव केला आहे. आता येवल्यात करू’, असे आव्हान राऊत यांनी छगन भुजबळ यांना दिले होते.

अजितदादा की शरद पवार? आशुतोष काळेंचं ठरलं! थेट अमेरिकेतून केला निर्णय जाहीर

साहेब, कुठे-कुठे माफी मागणार ?

काल येवल्यात येऊन तुम्ही माफी मागितली. पण कशासाठी माफी? आणि गोंदियापासून ते कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे माफी मागणार आहात? 50 ठिकाणी माफी मागणार का? सुरुवात तुमच्या घरातून झाली होती. ज्यांंना तुम्ही 60-62 वर्ष संभाळलं त्यांनी पुढाकार घेतला. ते आता उपमुख्यमंत्री आहेत. असं म्हणतं मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं.

Exit mobile version