Download App

राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.

नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजीनाम्याचे पत्र दातीर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवले आहे. त्यांच्या या निर्णयाने नाशिकच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे.

Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या

नाशिक जिल्हा हा मनसेसाठी नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मात्र येथेच मनसेला मोठे धक्के बसले आहेत. एकामागून एक पदाधिकारी राजीनामे देत आहेत. आताही दातीर यांनी राजीनामा देत ही परंपरा कायम राखली आहे.

पदाला आपण न्याय देऊ शकत नसल्याचे कारण देत राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. दातीर हे आधी शिवसेनेत होते. नंतर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र आज त्यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

दातीर यांनी खरंच वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला की यामागे आणखी काही कारणे आहेत याचे उत्तर मात्र मिळाले नाही. त्यांच्या या पुढील राजकीय वाटचालीवरून ते लक्षात येईल. त्यामुळे आता राजीनाम्यानंतर दातीर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Jitendra Awhad : आप्पासाहेब धर्माधिकारींचं नाव बदनाम करु नका…

दिलीप दातीर हे नाशिक मनसेतील महत्वाचे नेते आहेत. त्यांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात वैयक्ति कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आपणास अत्यंत विनम्रपणे माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पदावरून मुक्त करण्याची दरखास्त करत आहे असे दातीर यांनी पत्रात म्हटले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच दातीर यांनी राजीनामा दिल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Tags

follow us