Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या

Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या

Corruption in the office of Minister Sanjay Rathod : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करतील या चर्चांनी राजकीय वातावरणं चांगलचं तापलं आहे. अखेर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत घेत मी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं या चर्चेवर पडता पडला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय राठोड यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत. राष्ट्रादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनीही या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. राज्यातील एका मंत्र्याच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे अशी मागणी केली आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून तक्रार केली. या तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन उभे करू बंद पुकारण्याच इशारा संघटनेने दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही या प्रकरणावर सरकारला इशारा दिला. राज्यातील एका मंत्र्याच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे अशी मागणी केली आहे. तपासे यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याला हे सरकार पाठीशी घालणार की, त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करणार, हे जनतेसमोर जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

केमिस्ट अॅंड ड्रगिस्ट असोसिएशनचे आरोप काय?
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री व त्यांचे कार्यालय म्हणज, मंत्रालय नसून भ्रष्ट्रालय असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅंड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झाल्याचा या पत्रात नमूद केला आहे. राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. मात्र, औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करतांना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरिता प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरिता निलंबित करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते. तसेच परवाने कायमस्वरूपी रद्द करणे अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचं संघटनेने या पत्रात म्हटलं आहे.

मंत्रालयातील टपाल केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, पाहा फोटो…

शिवाय, अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जात आहे.प्रत्यक्षात औषध विक्रेत्यांना मंत्र्याची पीएस, ओसडी यांच्यावर प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार सुध्दा या पत्रात करण्यात करण्यात आली. या संदर्भात यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना भेटून या तक्रारी केल्यानंतर सुध्दा भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या तक्रारीची गांभीर्याने न घेतल्यास राज्य संघटना या विरोधात आंदोलन उभे करणार आहे. तसंच प्रसंगी बंद ही पुकारला जाईल व त्याच्य परिणामाला सरकार जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला.

दरम्यान, आता राष्ट्रवादीने मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं सरकार काय निर्णय घेते, हेच पाहणं महत्वाचं ाहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube