अखेर संजय राऊतांना शहाणपण सुचलं; म्हणाले, मी अजित पवारांबद्दल जे बोललो..

Sanjay Raut News : संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात काल चांगलचे शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावर संतप्त होत राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत […]

Sanjay Raut

Sanjay Raut

Sanjay Raut News : संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात काल चांगलचे शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावर संतप्त होत राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र नाराज व्यक्त झाल्यानंतर आता संजय राऊत यांना शहाणपण सुचले आहे.

राऊत म्हणाले, अजित पवार यांच्याबद्दल मी काल जे काही बोललो, त्याचा मला खेद वाटतो. मी असे बोलणे योग्य नाही असे म्हणत राऊत यांनी माघार घेतली. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांतील वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : Ajit Pawar युतीमध्ये येणार? दादांनी एका वाक्यात विषय संपवला…

संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझा आणि अजित पवार यांचा स्वभाव थोडा तापट असल्याने आम्ही दोघे पटकन व्यक्त होतो. अजित पवार यांच्याबद्दल मी जे बोललो त्याचा मला खेद आहे. आता यापुढे संपूर्ण भूमिका ऐकल्याशिवाय मी त्या विषयावर बोलणार नाही, असे मी ठरवले आहे. अजित पवार मविआतील अतिशय महत्वाचे नेते आहेत.

ते पुढे म्हणाले, माझा विरोध हा गद्दार आणि बेईमान प्रवृत्तींना आहे. त्यावर या आंदोलन करणाऱ्यांचे काय मत आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा देशाविरोधात काम करणाऱ्या गद्दारांविरोधात थुंकले होते. मग मी त्यांचा आदर्श घेतला तर त्यात वाईट काय? असा सवाल त्यांनी केला.

‘त्यांच्या बोलण्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत’; अजितदादांचा राऊतांवर पलटवार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर राऊत म्हणाले, नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावले जातात. समर्थकांचा अतिउत्साह असे म्हणावे लागेल. त्यांना कुणीही सांगत नाही की अशी बॅनरबाजी करा.

Exit mobile version