Ajit Pawar युतीमध्ये येणार? दादांनी एका वाक्यात विषय संपवला…

Ajit Pawar युतीमध्ये येणार? दादांनी एका वाक्यात विषय संपवला…

Ajit Pawar News : माझं मी सांगायला खंबीर आहे, दुसऱ्याने माझं वकीलपत्र घेण्याचं काही एक कारण नसल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना सुनावलं आहे. दरम्यान, भरत गोगावले यांनी अजित पवार युतीत येण्याबाबत विचाराधीन असून अजितदादा भाजप-शिंदे गटाच्या युतीमध्ये येणार असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अशा चर्चा करणाऱ्यांना अजित पवारांनी गोगावलेंसह इतर नेत्यांना खडसावलं आहे.

Letsupp Special : रेल्वे अपघाताचे ‘वंदे भारत’ कनेक्शन; मालगाड्यांचे प्रमाण अन् वाढती ठेकेदारीही मुळाशी?

अजित पवार म्हणाले, भरत गोगावले बोलत असतील त्याला मी काय करु, मी माझं सांगण्यासाठी खंबीर आहे. दुसऱ्याने माझं वकीलपत्र घेण्याचं कारण नाही. माझी भूमिका ही स्पष्ट असते याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मी राष्ट्रवादीत स्थापना झाल्यापासून काम करीत आहे. कालही राष्ट्रवादीत, आजही राष्ट्रवादीत अन् उद्याही राष्ट्रवादीतच काम करणार असल्याचं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? शरद पवारांच्या शिलेदारासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग

तसेच काही लोकांची आमच्या सारख्या नेत्यांची नावे घेतल्यावर बातमी होते. त्यानंतर तुम्ही बातमी चालवतात. आता भरत गोगावले असो अथवा कुणीही त्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Gautami Patil : बेटा मला काही नकोय, एकदा येऊन भेट… गौतमीच्या वडिलांची भावनिक साद

राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. त्यावेळी अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी आता बॉंड पेपरवर लिहुन देऊ का, असं म्हणत अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितलं होतं.

शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजी नाट्य; गंभीर आरोप करत तटकरेंचा काढता पाय

आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेच्या वक्तव्यानंतर अजित पवार युतीत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मी राष्ट्रवादीच कायम राहणार असल्याची भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, लोकांचं माझ्यावर जास्तच प्रेम आहे, म्हणूनच माझी अशी चर्चा केली जात, असल्याचा टोला मिश्किल अंदाजात अजित पवार यांनी विरोधकांला लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube