शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजी नाट्य; गंभीर आरोप करत तटकरेंचा काढता पाय
Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित होते.
एकाबाजूला हा सोहळा साजरा होत असतानाच दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य पहायला मिळालं. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे कार्यक्रमामध्ये बोलू न दिल्याने नाराज झाले. कार्यक्रमामध्ये राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याचा आणि आयोजनातील त्रुटींवर बोलू न दिल्याचा आरोप करत ते कार्यक्रमातून तडक निघून गेले.
SSC Result 2023 : आज जाहीर होणार दहावीचा निकाल; ‘असा’ पहा निकाल
यावेळी बोलताना तटकरे म्हणाले, देशात 542 खासदार आहेत. त्यापैकी मी एक आहे. रायगडचा खासदार म्हणून बोलण्याची संधी द्यायला हवी होती. हा राज्य सरकारचा कार्यक्रम होता. पण ज्याप्रकारे स्वयंघोषित स्वागताध्यक्षांनी कार्यक्रम हातात घेतला ते बरोबर नाही, असे म्हणत नाव न घेता त्यांनी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधल. राजशिष्टाचाराचे संपूर्ण नियम पायदळी तुडवण्यात आले. राजकीय अभिनिवेषाने हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला, असे त्यांनी सांगितले.
Video : सरकाराच्या कामात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे प्रतिबिंब : नरेंद्र मोदी
मला वाटलं होती की ,छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी मला बोलता येईल. पण स्वयंघोषित स्वागताध्यक्षांनी याठिकाणी भाषण केलं. त्याविभागाच्या मंत्र्यांनी भाषण केलं असतं तर मी समजू शकलो असतो. पण राजकीय हेतूने ज्या घटना घडल्या त्यामुळे माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस त्याठिकाणी थांबू शकत नाही, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान.कार्यक्रमानंतर या प्रकरणावर मंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा 350 वा सोहळा होता. हा कुणाच्या मान-अपमानाचा सोहळा नाही. हा छत्रपतींचा सोहळा असून प्रत्येकाने लीनपणे यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.