Video : सरकाराच्या कामात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे प्रतिबिंब : नरेंद्र मोदी

  • Written By: Published:
Video : सरकाराच्या कामात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे प्रतिबिंब : नरेंद्र मोदी

Shiv Rajyabhishek Sohala 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला. ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. या विशेष दिवसाचे औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत शिवाजी महाराजांच्या कार्याची उजळणी केली.

छत्रपती उदयनराजेंना शिंदे सरकारकडून मोठी जबाबदारी; प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

ते म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत श्रेष्ठ भारताच्या व्हिजनमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेनं अनेक पिढ्यांना प्रेरित केलं आहे. त्यांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे. आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की जगाच्या अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होतं ही बाब देशासाठी अतिशय अभिमानाची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या कारभाराचे मूलभूत घटक होते असे म्हणत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत श्रेष्ठ भारताच्या व्हिजनमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आहेत, त्यांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितलं. एक महिन्यापूर्वीच मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. त्यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षं पूर्ण होणं हीच एक प्रेरणादायी बाब आहे.

https://www.youtube.com/watch?v=9GABztwZEBU

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube