छत्रपती उदयनराजेंना शिंदे सरकारकडून मोठी जबाबदारी; प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती उदयनराजेंना शिंदे सरकारकडून मोठी जबाबदारी; प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळादिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्यावरुन मोठी घोषणा केली. राज्य शासनाकडून रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.  (Chhatrapati Udayanraje Bhosale appoint as Pratapgad Authority chairman)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा राज्य शासनाच्या वतीने किल्ले रायगडावर साजरा झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दीपक केसरकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनील तटकरे आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक; फडणवीसांनी दिला शब्द

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अन्य महत्वाच्या घोषणाही केल्या. शिवराज्याभिषेकाचे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय मुंबई येथील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी निधी देणार असल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, वाघनखं परत देण्याचं ब्रिटनचं पत्र; मुनगंटीवारांची माहिती

संभाजीराजे छत्रपतींवर आहे रायगडची जबाबदारी :

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांचयाकडे रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 2017 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्राधिकरणाची स्थापना करत संभाजीराजे छत्रपतींची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. यानंतर आलेल्या ठाकरे सरकारनेही त्यांची नियुक्ती कायम ठेवली होती. आता शिंदे सरकराच्या काळातही संभाजीराजेंकडेच अध्यक्षपद आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube