दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक; फडणवीसांनी दिला शब्द

दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक; फडणवीसांनी दिला शब्द

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे, असे सांगितले.

ते म्हणाले, आपण सगळ्यांनी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून आज आपल्याला येथे या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आलं.

छत्रपती उदयनराजेंना शिंदे सरकारकडून मोठी जबाबदारी; प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

या राष्याभिषेकाने नवी नाणी तयार केली. परकीयांच्या तावडीतून गडकिल्ल्यांची सुटका करून त्यांचे नवे अस्तित्व निर्माण केले. भाषा शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या राजमुद्रेवरील इंग्रजांची राजमुद्रा काढली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ठेवली.

आमदार भरत गोगावले यांनी शिवसृष्टीसंदर्भात मागणी केली आहे. त्यासाठी माझेही समर्थन असून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिफारस करतो. त्यानंतर छत्रपती उदयनराजे यांनी राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली आहे. त्यांनी मी विश्वास देतो की मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ आणि दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक तयार करू, असे फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, भरत गोगावले, आ. बच्चू कडू आदी उपस्थित होते.

Video : सरकाराच्या कामात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे प्रतिबिंब : नरेंद्र मोदी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube