शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, वाघनखं परत देण्याचं ब्रिटनचं पत्र; मुनगंटीवारांची माहिती

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, वाघनखं परत देण्याचं ब्रिटनचं पत्र; मुनगंटीवारांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती.  आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे.

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या मर्यादामुळे काहींना अद्याप गडावर जाऊ दिलेले नसले तरीसुद्धा शिवप्रेमींमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते देखील रायगडावर दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रायगडावर दाखल झालेले असून छत्रपती उदयनराजे देखील रायगडावर आलेले आहेत. तसेच राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनंगटीवार हे देखील या कार्यक्रमाला आले आहे. यावेळी त्यांनी उपस्थित शिवप्रेमींसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

१९५३ पासून अफजलखानाच्या कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याला हटविण्याचे काम राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. तसेच ज्या अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला त्याचे पोट महाराजांनी ज्या वाघनखांनी फाडले, ती वाघनखे भारतात येणार आहे. तीन दिवसांपूर्वीच ब्रिटनने वाघनखे परत देणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

SSC Result 2023 : आज जाहीर होणार दहावीचा निकाल; ‘असा’ पहा निकाल

ज्यावेळी त्या वाघखांचे दर्शन आपण घेऊ तेव्हा आपल्या डोळ्यातील उर्जेने आजही जे लोक अफजलखानाच्या मार्गावर चालत आहे, त्यांचा कोथळा काढण्याची शक्ती लोकशाहीच्या मार्गाने शिवभक्तांना मिळेल, अशा शब्दात मुनगंटीवारांनी इशारा दिला आहे. तसेच आम्ही १ कोटी शिवभक्तांचे पोर्टल तयार करणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube