Download App

नगर हादरले! दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा खून; निलंबित पोलिसासह एकाला बेड्या

नगरमधील काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar News : नगरमधील काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून तब्बल २१ दिवसांपासून परदेशी हे बेपत्ता होते. दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे समोर आले आहे. नगर मनमाड रोडवरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सागर गिताराम मोरे (रा. ब्राह्मणी) व निलंबित पोलीस कर्मचारी किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी दीपक परदेशी हे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या मिसिंग होण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस दीपक परदेशी यांचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून देखील परदेशी यांचा शोध सुरू होता.

‘आम्हाला एक खून माफ करा…’, रोहिणी खडसेंचं महिला दिनी थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?

तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार सागर मोरे व किरण कोळपे या दोघांवर पथकाला संशय आला. पथकाने दोन्ही संशयितांना राहुरी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता दीपक परदेशी यांचे विळद येथील लोकांकडे उसणे दिलेले पैसे अडकले होते. ते पैसे आपण काढून देऊ मात्र, गावातील लोकांकडे असलेले पैसे काढणे अवघड असल्याने दीपक परदेशी यालाच पैसे मागू असा प्लॅन ठरला. त्यानुसार परदेशी यांचे अपहरण करून त्यांच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, परदेशी यांनी नकार दिल्याने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर निंबळक बायपास रस्त्याने विळद परिसरात मृतदेह फेकून दिल्याचे त्यांनी पोलीस पथकाला सांगितले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सागर गिताराम मोरे (रा. ब्राह्मणी) आणि किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) अशी आहेत. तसेच या प्रकरणात पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले असले, तरी यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेतून शिकून आलेल्या नातवाचा प्रताप; संपत्तीच्या वाटणीवरून आजोबांचा केला निर्घृण खून

follow us