धक्कादायक! केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील चेन हिसकावली; नाशिकमधील घटना

Nashik News : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईल चोरीच्या घटना रोजच घडत असतात. आता हीच घटनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईबाबत घडली आहे. पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी हिसकावून नेली. नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी […]

Crime

Crime

Nashik News : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईल चोरीच्या घटना रोजच घडत असतात. आता हीच घटनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईबाबत घडली आहे. पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी हिसकावून नेली. नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

याबाबत टीव्ही 9 ने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी भारती पवार यांच्या आई भाजी खरेदी करण्यासाठी घराबाहेर निघाल्या होत्या. काही अंतर चालत गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून नेत पळ काढला.

राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड; 24 कोटीचे दागिने, 1 कोटींची रोकड जप्त

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनीही या घटनेची तत्काळ दखल घेतली. नाशिक शहरातील म्हसरुळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची समजते आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. त्याआधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेतील चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Exit mobile version