राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड; 24 कोटीचे दागिने, 1 कोटींची रोकड जप्त

राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड; 24 कोटीचे दागिने, 1 कोटींची रोकड जप्त

जळगाव : जळगाव शहरातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सचे (Rajmal Lakhichand Jewellers) मालक ईश्वरलाल जैन (Ishwar Lal Jain) यांच्यावर काल ईडीने (ED) छापा टाकला. तब्बल चाळीस तासाहून अधिक काळ ही छापेमारी चालली. ईडीने या छापेमारीत  24 कोटी 7 लाख रुपयांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय, ईडीने जैन यांच्या 50 कोटींच्या 60 मालमत्तेची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. यामुळं लखीचंद ज्वेलर्सला चांगलाच फटका बसला. ईडीच्या या कारवाईने जळगावात खळबळ उडाली आहे.

ईडीकडून ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित सुमारे 13 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यांच्याकडून 39 किलो सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत 24 कोटी 7 लाख रुपये होती. या कारवाईत ईडीकडून 1 कोटी 11 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 50 कोटी रुपयांच्या 60 मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. याशिवाय जळगाव आणि जामनेरमध्ये जैन यांच्या नावावर दोन बेनामी मालमत्ता आढळून आल्या आहेत. या कारवाईतून ईडीच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. त्यामुळे ईडी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली 35 काडतुसे 

ही धाड कावराई ईडीच्या 60 हून अधिक अधिकाऱ्यांनी पार पाडली. ईडी अधिकाऱ्यांची ही कारवाई सलग 40 तास सुरू होती. ईडीने सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार मनीष जैन यांनी या कारवाईनंतरही हार मानली नाही. त्यामुळेच आपण सर्व कायदेशीर बाबींना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ईडीच्या या कारवाईवर ईश्वरलाल जैन यांनीही आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, ईडी ज्या पद्धतीने कारवाई करत आहे ते चुकीचे आहे. एसबीआय बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विषय माध्यमांना सांगितला होता, त्यातून हे सगळं घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या सर्व कारवाईला आम्ही कायदेशीर पध्दतीने लढा देऊ. आम्ही समन्स बजावल्यानुसार, चौकशीसाठी जाणार आहोत, असं जैन यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube