Ahmednagar News : तापमान वाढीचे संकट आपल्यासमोर आहे. शेतीला या तापमानवाढीचा धोका आहे. शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकरी व कष्टकरी दोघांनाही न्याय द्यायचा आहे. पण भविष्यात शेतकरी आणि कष्टकरी यांच्यात संघर्ष सुरू होईल का अशी भीती वाटायला लागली आहे.
शेतीच्या मजुरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर रोजगार हमी योजनेत (Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme) शेतीचे मनुष्य दिवस जोडले गेले पाहिजेत. शेतीतील पेरणी, नांगरणी, कोळपणी आणि सोंगणी या कामांचे ठराविक दिवस रोजगार हमी योजनेत जोडले तर शेतकऱ्यांच्या मजुरीचा मोठा प्रश्न मिटेल असे स्पष्ट करत यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदर्शगाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी केले.
Raj Thackeray : अडचणीच्या काळात राज ठाकरे आठवतात, मतदानाच्यावेळी काय होतं?
नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या हमाल माथाडी कामगारांच्या राज्यपातळीवरील अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार संग्राम जगताप, आ. निलेश लंके, आ. प्राजक्त तनपुरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, लातूर येथील भूकंपाच्या वेळी शरद पवार यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. तसेच शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळातच फलोद्यान योजना आली. आज या योजनेचा परिणाम असा आहे की जितके पाहिजे तितकी फळे उपलब्ध आहेत. देशात कोरोनाचे संकट आले. या काळात शाळा बंद होत्या. मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हिवरेबाजारने ऑफलाइन शाळा चालवली. मध्यंतरीच्या काळात राजपत्रित कर्मचारी संघटना , शिक्षक संपावर होते. त्या काळात तर गावकऱ्यांनी शाळा चालवली.
कोणताही फॉर्म न भरता 2000 च्या नोटा बदलता येणार; SBI ने काढले पत्रक
शेतीतील मजुरीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोहयोत शेतीचे मनुष्य दिवस निश्चित करून योजनेल जोडा. नांगरणी, कोळपणी, पेरणी आणि सोंगणी याचे ठराविक दिवस रोहयोला जोडले तर शेतकऱ्याच्या मजुरीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शरद पवार यांनी याकामी पुढाकार घ्यावा. कारण, त्यांनी शब्द टाकला तर केंद्र सरकार नक्कीच विचार करतं. मातीची माहिती असणारा त्यांच्यासारखा दुसरा नेता आज तरी देशात नाही, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.