Raj Thackeray : अडचणीच्या काळात राज ठाकरे आठवतात, मतदानाच्यावेळी काय होतं?

Raj Thackeray : अडचणीच्या काळात राज ठाकरे आठवतात, मतदानाच्यावेळी काय होतं?

MNS Chief Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्वसामान्य माणूस तुफान गर्दी करतो. मात्र, राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. हे मागील अनेक निवडणुकांवरून दिसत आहे. दरम्यान, आज हीच खंत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना (farmers) स्पष्टपणे बोलून दाखवली. (Raj Thackeray question to the Nashik farmers)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिक शहरात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाण राज ठाकरेंना ऐकवलं.

जमीन अधिग्रहित करताना आपल्याला विचारलं नसल्याचं शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं. राज्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालं, तर बँकेची वसुली , कांद्याचं भाव पाडणं यावर आपण तोडगा काढवा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होतं? असा थेट सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना उद्देशून राज ठाकरे जे बोलले त्याची चांगलीच त्याची चांगलीच चर्चा होत आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

दरम्यानच्या काळात शेतकरी संपावर गेले होते. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या वेळी माझ्याकडे येता आणि निवडणुकीत मतदान त्यांना करता. त्यावेळी शेतकरी मला म्हणाले, साहेब, समस्या वेगळी आणि मतदान वेगळे. जे तुम्हाला मदत करत नाहीत त्यांना तुम्ही मतं देत असाल तर मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे का येता? महाराष्ट्र टोलमुक्त करू असे म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं की नाही? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. आपण काय करत आहात याची जाणीव ठेवा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

पवारांनी फुंकलं रणशिंग! कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचा दाखला देत म्हणाले, आता संघर्षासाठी..

यावेळी शेतकऱ्यांनीही राज ठाकरे यांचे म्हणणे ऐकून घेत आता सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनीही आपला राग आवरता घेतला. यावेळी त्यांनी येत्या तीन-चार दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube