अहिल्यानगर : महाराष्ट्र पोतराज सेनेच्या (Maharashtra Potraj Sena) राहुरी तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी महाराष्ट्र पोतराज सेनेचे राहुरी तालुक्यातील तसेच मतदार संघातील पदाधिकारी आणि स्थानिक पोतराज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी फक्त भावकीसाठी नाही तर गावकासाठी काम करतो…; सुनील शेळकेंचा भेगडेंवर हल्लाबोल
यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की, पोतराज सेना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी नेहमीच संपर्क असतो, तसेच त्यांचं कायम सहकार्य राहिलेलं आहे. त्यांच्या कामातील समस्या देखील आपण जाणून आहोत. पोतराज सेनेने खंबीरपणे दिलेला पाठिंबा नक्कीच महाविकास आघाडी आणि आपल्या विजयात मोलाचा ठरणार आहे, असं ते म्हणाले.
येणाऱ्या काळात पोतराजे सेनेच्या मागण्या आणि कामे मार्गी लावली जातील. पोतराज संघटनेच्या अनेक सदस्यांचे नगर पाथर्डी तालुक्यात देखील नेहमीच सहकार्य लाभलेले आहे, असंही तनपुरे म्हणाले.
विधानसभेला तनपुरेंचेच काम करू…
पोतराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कणगरे यावेळी म्हणाले की, आपण राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढवत आहात. आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आपणाला जाहीर पाठींबा आज रोजी देत आहोत. विधानसभेला आम्ही तनपुरे साहेबांचेच काम करू. आपणही येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून असणाऱ्या मागण्या व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, अशी आम्हाला खात्री आहे, असंही ते म्हणाले.
Video: जय शाहला बुध, गुरू अन् शुक्राचा अध्यक्ष करा; गावच्या मुलांचा उल्लेख करत ठाकरेंचं थेट चॅलेंज
दरम्यान, जाहीर पाठींबा देण्यासाठी रामदास कणगरे – संस्थापक अध्यक्ष, ज्ञानेश्वर जगधने – कार्य अध्यक्ष, देविदास वैरागर – राज्य उपाध्यक्ष, लखन ससाणे – राज्य सरचिटणीस, पोपट भिकाजी दिवे – ज्येष्ठ कार्यकर्ते, सुरेश जगधने – तालुकाध्यक्ष, पप्पू वैरागर – युवक तालुकाध्यक्ष सह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.