Download App

राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक आणि अहिल्यानगर केंद्रातून ‘मुंग्यांची दुनिया’ने मारली बाजी…

राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक आणि अहिल्यानगर केंद्रातून नाट्य भारती, इंदौर या संस्थेच्या मुंग्यांची दुनिया या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.

  • Written By: Last Updated:

नगर : महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत (Maharashtra Rajya Bal Natya Spardha) नाशिक आणि अहिल्यानगर केंद्रातून नाट्य भारती, इंदौर या संस्थेच्या मुंग्यांची दुनिया (Mungyanchi Duniya) या नाटकाला प्रथम पारितोषिक, सप्तरंग थिएटर्स, अहिल्यानगर या संस्थेच्या तेरा मेरा सपना या नाटकास द्वितीय पारितोषिक, आनंद तरंग फौंडेशन, वाघोरे या संस्थेच्या हॅपी बर्थ डे या नाटकासाठी तृतीय पारितोषिक आणि आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकणठाम या संस्थेच्या विसर्जन या नाटकास चतुर्थ पारितोषिक प्राप्त झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे (Bibhishan Chaware) यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली.

Ahilyanagar Mahakarandak : मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया 

या चारही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली. ६ ते १३ जानेवारी या कालावधीत नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृह आणि अहिल्यानगर येथील माऊली सांस्कृतिक सभागृह येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ४३ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सचिन गिरी, बापुराव गुंगे आणि संयुक्ता थोरात यांनी काम पाहिले.

अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक – अनिरुध्द किरकिरे (नाटक-मुंग्यांची दुनिया)
द्वितीय पारितोषिक – कल्पेश शिंदे (नाटक- तेरा मेरा सपना)

प्रकाश योजना
प्रथम पारितोषिक कुतार्थ कंसारा (हॅपी बर्थ डे)
द्वितीय पारितोषिक प्रणव प्रभाकर (नाटक- रिले)

नेपथ्य
प्रथम पारितोषिक श्रृतीका जोग (नाटक- मुंग्यांची दुनिया)
द्वितीय पारितोषिक विक्रम गवांदे (नाटक- ड्रिम कॅचर)

‘त्या’ लॅम्बोर्गिनी गाडीच्या काचा खाली घेतल्या असत्या तर…’; राधाकृष्ण विखेंचा रोहित पवारांवर पलटवार 

रंगभूषा
प्रथम पारितोषिक माणिक कानडे (नाटक- अंगाई)
द्वितीय पारितोषिक तेजा पाठक (नाटक- फुलपाखरु)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक
हिमांक कुळकर्णी (नाटक- मुंग्यांची दुनिया) व गायत्री रोहोकले (नाटक-तेरा मेरा सपना)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
प्रांजल सोनवणे (नाटक- हॅपी बर्थ डे)
श्रध्दा शिंदे (नाटक- मला उत्तर हवंय)
सानुजा कुळकर्णी (नाटक- अंगाई)
प्राची वाघ (नाटक- म्याडम)
सई दळवी (नाटक- सरणार कधी तम)
सौरभ क्षिरसागर (नाटक- हॅप्पी बर्थ डे)
चैतन्य गांगुर्डे (नाटक- नको ना रे ब्रम्हा)

दुर्गेश सोनवणे (नाटक- वासुदेव आला रे)
वैष्णव निमसे (नाटक- विसर्जन)
साईराज सरंडे (नाटक-तेरा मेरा सपना)

follow us