नाट्य रसिकांसाठी खास मोजवानी!‘सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका स्पर्धा

नाट्य रसिकांसाठी खास मोजवानी!‘सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका स्पर्धा

Srujan The Creation Organized One act competition : मराठी नाट्य रसिकांसाठी मोजवानी ठरणारी भव्य एकांकिका स्पर्धा ( One act competition ) भरणार आहे. त्यासाठी गेली चार वर्ष सृजन द क्रियेशनही संस्था नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी ४ वर्षांची होतेय.

बालवडकर यांचे कार्यालय नागरिकांसाठीचे सेवाकेंद्र : फडणवीस यांच्याकडून कौतुक

लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. गेल्या चार वर्षात या संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक प्रतिष्ठित स्पर्धेत पुरस्कार मिळवले आहेत.

छाती फाडली की मरून जाशील स्वतः ला हनुमान समजायला लागला? अजितदादांनी सोनवणेंना भरला दम

१५ मे रोजी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल सावंत आणि राजेश देशपांडे लिखित ‘तीनसान’ आणि ‘श्यान पण’देगा देवा’ ह्या दोन पारितोषिक प्राप्त एकांकिकांचा प्रयोग प्राबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे रात्री ८ वाजता होणार आहेत. मराठी नाट्य रसिकांनी ह्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था प्रमुख राजेश देशपांडे यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या