‘मानाचि’चा वर्धापनदिन दिमाखात, नाटककार सुरेश खरेंच्या कारकीर्दीचा गौरव
Suresh Khare : ‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे (Suresh Khare) आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले . मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात ते बोलत होते.
“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, अॅड-गुरू भरत दाभोळकर, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी सुरेश खरे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. हा सोहळा दिनांक ६ मे २०२४ रोजी संध्याकाळी, मुंबईतल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला.
मोठी बातमी : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर खून खटल्याचा फैसला; दोघांना जन्मठेप तर, तिघे निर्दोष
सुरेश खरे यांच्या सन्मानार्थ गंगाराम गवाणकर म्हणाले, ‘सुरेश खरे यांच्या नाटकातून बॅकस्टेज वर्कर म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे सुरेश खरे आणि मी दोघेही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झालो आणि मानाचिच्या लेखन कारकीर्द सन्मानाचे मानकरीही झालो.
या सन्मान संध्येत, मालिका, नाटक, चित्रपटांच्या प्रशंसनीय लेखनासाठी राकेश सारंग, अनिल पवार, अदिती मारणकर, कौस्तुभ देशपांडे, स्वप्निल जाधव, सचिन जाधव, क्षितिज पटवर्धन, नितीन सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्या बरोबरच अन्य क्षेत्रातल्या प्रशंसनीय लेखनाबद्दल, नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, गेली पंचवीसहून अधिक वर्ष, ‘अर्थ आणि बँकिंग’ सदर लिहिणारे राजीव जोशी, गणेशोत्सव देखाव्यांच्या लेखनासाठी विजय कदम यांनाही सन्मानित करण्यात आलं. मानाचिच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश गारगोटे आणि मेश ओमाशे यांचाही सन्मान करण्यात आला. आशिष पाथरे यांच्या खुसखुशीत निवेदनानं ही सन्मान संध्या रंगली.
त्या पूर्वी, मानाचि लेखक संघटनेनं आयोजित केलेल्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाच एकांकिकांचं सादरीकरण झालं. महाराष्ट्रभरातून १४ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम फेरीत संहिता क्रिएशन्स मुंबईच्या, ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. तर बीएमसीसी पुणे यांनी सादर केलेल्या ‘A tale of Two’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा अशी पारितोषिकं पटकावली.
ॲड-गुरु भरत दाभोळकर, लेखक आनंद म्हसवेकर, रामनाथ थरवळ, पुरुषोत्तम बेर्डे, विजय टाकळे, राजीव जोशी, होम मिनिस्टरचे लेखक महेंद्र कदम, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
गिरीश ओक, ईला भाटे, विश्वास सोहनी, हेमंत भालेकर व शिल्पा नवलकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळी उत्स्फूर्त एकांकिका या नाट्यप्रकारचे जनक सुहास कामत, आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर व प्रमोद लिमये यांचा प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक
(मानाचि आणि रामनाथ थरवळ पुरस्कृत २५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह )
एकांकिका : एकांकिका : 14 इंचाचा वनवास – प्रस्तुत : संहिता क्रिएशन्स, मुंबई
सर्वोत्कृष्ट एकांकिाक द्वितीय क्रमांक
(कवी कै रामचंद्र विष्णू कोंडेकर यांच्या स्मरणार्थ अलका नाईक पुरस्कृत 15,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह)
एकांकिका : एकांकिका : A tal of Two – प्रस्तुत: बीएमसीसी पुणे
सर्वोत्कृष्ट लेखक : प्रथम क्रमांक
( गंगाराम गवाणकर पुरस्कृत रोख ११००० रुपये आणि सन्मानचिन्ह)
कार्तिक बहिरट आणि राज दीक्षित – एकांकिका – ए टेल ऑफ टू: सादकर्ते बीएमसीसी पुणे
सर्वोत्कृष्ट लेखक द्वितीय क्रमांक
(आणि कै. सुरेश नारायण दरेकर यांच्या स्मरणार्थ सचिन दरेकर पुरस्कृत रु. 9,000 रोख )
रोहित कोतेकर, रोहन कोतेकर, केतन साळवी – एकांकिका : १४ इंच वनवास – प्रस्तुत : संहिता क्रिएशन, मुंबई
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक
(आशिष पाथरे पुरस्कृत रोख ५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह )
रोहित कोतेकर, रोहन कोतेकर, केतन साळवी – एकांकिका : १४ इंच वनवास – प्रस्तुत : संहिता क्रिएशन, मुंबई
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक
(कै. सिंधू औंधे यांच्या स्मरणार्थ अरविंद औंधे पुरस्कृत रोख 3,000 रुपये आणि सन्मानचिन्ह )
कार्तिक बहिरट – एकांकिका : ए टेल ऑफ टू*- प्रस्तुत: बीएमसीसी पुणेो
सर्वोत्कृष्ट कथा विस्तार प्रथम
(श्वेता पेंडसे पुरस्कृत रोख रु.३,००० व सन्मानचिन्ह)
कार्तिक बहिरट /राज दीक्षित – एकांकिका : A Tale of Two – सादरकर्ते : बीएमसीसी पुणे
सर्वोत्कृष्ट कथा विस्तार द्वित्तीय
(लेखक कवी कै.राजा गायंगी स्मरणार्थ शिल्पा गायंगी गंजी पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह)
रोहित कोतेकर ,रोहन कोतेकर ,केतन साळवी – एकांकिका : १४ इंचाचा वनवास – सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई
विनोदी अभिनेता
राज दीक्षित – A Tale of two
अमेय परब – १४ इंचाचा वनवास
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
श्रेयसी वैद्य – खूप लोक आहेत
साक्षी पाटील – Who is the culprit
अभिनेता प्रथम क्रमांक
रंजन प्रजापती – १४ इंचाचा वनवास
अभिनेता द्वितीय क्रमांक
रोशन मोरे – खूप लोक आहेत
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
कार्तिक बहिरट – A tale of Two
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
मधुरा राऊत आणि रिद्धी टेंबवलकर – १४ इंचाचा वनवास
सर्वोत्कृष्ट संगीत
शुभम ढेकळे – १४ इंचाचा वनवास
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
कार्तिक बहीरट आणि अथर्व ढेबे – A tale of two
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
निखिल मारणे – A Tale of Two