Download App

हॉटेलवर चहा घेताना माजी महापौरावर झाडल्या गोळ्या; मालेगावमधील धक्कादायक घटना

Malegaon Crime टेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना माजी महापौरांवर एका मागे एक तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात घडली आहे.

Malegaon Crime Firing on EX-Mayor : हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना माजी महापौरांवर ( EX-Mayor ) एका मागे एक तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात ( Malegaon Crime ) घडली आहे. शहराचे माजी महापौर आणि एमआयएमचे मालेगाव शहराध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा ( Abdul Malik Yunus Issa ) असे या माजी महापौरांचे नाव आहे. दरम्यान सध्या मालेगाव शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात आता थेट माजी महापौरांवरच अशा प्रकारे हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला जात आहे.

Box Office:’श्रीकांत’ आणि ‘भैय्या जी’मध्ये जोरदार स्पर्धा, ‘या’ सिनेमाची 37 कोटींहून अधिक कमाई

नेमकी घटना काय?

मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये अब्दुल मलिक हे चहा घेत होते. त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर एका मागे एक अशा गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये त्यांच्या हाताला, पायाला आणि छातीजवळ अशा तीन गोळ्या लागल्या. या हल्ल्यात अब्दुल मलिक हे सुदैवाने बचावले आहेत. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे.

Box Office: ‘श्रीकांत’ सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर बोलबाला; 17 दिवसांत कमावले तब्बल…

या घटनेनंतर या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या घटनेनंतर घटनास्थळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव एकत्र आला होता. त्यामुळे सध्या शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून पोलिसांकडून ही परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ माजली आहे.

मालेगावमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढलं

तर मालेगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढलं आहे. या अगोदर देखील झोडगे या भागामध्ये दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येत एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर यावेळी त्यांनी हवेमध्ये गोळीबार करत पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याला धमकी देत खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर आता थेट माजी महापौरांवरच अशा प्रकारे हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला जात आहे.

follow us