Chandigarh Mayor Election: भाजपला चपराक ! चंदीगडचा महापौर ‘आप’चाच, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing Result: चंदीगड महापौर (Chandigarh Mayor) निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक एेतिहासिक निर्णय दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविलेल्या आठ मतपत्रिका न्यायालयाने वैधत ठरवत आपचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून घोषित केले आहे. आपच्या आठ नगरसेवकांचे मतदान निवडणूक अधिकाऱ्याने बाद ठरविले होते. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला होता. त्यानंतर आपने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर दोन दिवस सुनावणी झाली.
याचिकाकर्ते व महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना आठ मते पडली होती. निवडणूक अधिकाऱ्याने आठ मते बाद ठरविले होते. हे मते न्यायालयाने पात्र ठरविले आहेत. त्यामुळे आपच्या उमेदवाराला वीस मते मिळत आहे. त्यामुळे कुलदीप कुमार यांची चंदिगडच्या महापौरपदी निवड झाल्याचे न्यायालयाने घोषित केले. निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी भाजपचा उमेदवाराला विजयी घोषित केले होते. न्यायालयाने हा निर्णय रद्द केला आहे.
मेगा भरतीत मराठा आरक्षण लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
मतपत्रिकेवर खाडाखोड हेतूपरस्पर
भाजपकडे संख्याबळ नसताना चंदीगड महानगरपालिकेर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा चमत्कार घडवत आपल्या पक्षाचा महापौर निवडून आणला होता. परंतु निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी आपली चूक न्यायालयासमोर कबूल केली. त्यानंतर तर मतमोजणीचा संपूर्ण व्हिडिओ, मतपत्रिका सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. आजच्या सुनावणीत न्यायालयाने व्हिडिओ आणि मतपत्रिका बघितल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने हेतूपरस्पर चुकीचे वर्तन केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
अरविंद केजरीवालांनी मानले न्यायालयाचे आभार
चंदीगडच्या महापौरपदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. तर आपच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. संघर्षाच्या काळात लोकशाही वाचविल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Maratha Reservation Bill : मराठा समाजाची सरकारकडून पुन्हा फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
In a significant development, the Supreme Court on Tuesday (February 20) declared Aam Aadmi Party Councillor Kuldeep Kumar as the Mayor of the Chandigarh Municipal Corporation.
Read more: https://t.co/Vo05piIU11#SupremeCourt #ChandigarhMayorElection pic.twitter.com/rKsfRqVDQx— Live Law (@LiveLawIndia) February 20, 2024