Download App

Manoj Jarange यांची तोफ नगर जिल्ह्यात पुन्हा धडाडणार; ‘या’ गावात घेणार सभा

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यातच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केले आहे. सरकारकडून त्यांना आश्वसन देण्यात आले असल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. सध्या जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथून निघालेलं हे वादळ नगर जिल्ह्यात देखील धडकणार आहे.

Butterfly Movie: ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा विशेष शो

मनोज जरांगे यांची नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात सभा पार पडणार आहे. नेवासे तालुक्यात जरांगे यांची 23 नोव्हेंबर रोजी विराट सभा पार पडणार असून सभेची जयंत तयारी करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सोनईतल्या जगदंबा देवी मंदिरात असलेल्या हॉलमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.

Sujay Vikhe यांच्याकडून लोकसभा, विधानसभेची पायाभरणी; विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. सध्या जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान धाराशिव येथून सुरु झालेला त्यांचा दौरा हा नगर जिल्ह्यात देखील असणार आहे. जरांगे यांची येत्या 23 नोव्हेंबर रोजी नेवासा तालुक्यात विराट सभा पार पडणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सोनईतल्या जगदंबा देवी मंदिरात असलेल्या हॉलमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.

IND vs AUS Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का अन् विराटच्या ‘त्या’ फोटोची जोरदार चर्चा !

तसेच सभेच्या जनजागृतीसाठी सोनई परिसरात मोठ मोठे फ्लेक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रिक्षामधून अनाउन्समेंट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सोनई गावाच्या अवतीभवती तब्बल बारा वाड्या आहेत. या सर्वच वाड्यांवरचा मराठा समाज बांधव नेवासातल्या या सभेला हजारोंच्या संख्येने कसा उपस्थित राहील, याचं नियोजन करण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांचा दौरा…

20 नोव्हेंबर आळंदी, तुळापूर, पुणे, खालापूरात असतील. 21 नोव्हेंबर कल्याण, ठाणे, पालघरला सभा घेणार आहे. तर 22 नोव्हेंबर त्र्यंबकेश्वर विश्रांतगड, संगमनेर आणि 23 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, येथे जरांगे सभा घेणार आहे. दरम्यान जरांगे यांची सभा पार पडणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून तसेच प्रशासनकडून देखील योग्य ते नियोजन केले जाऊ लागेल आहे.

Tags

follow us