मराठा अन् धनगर समाजाला तोडण्याचा प्रयत्न; अंजनगाव तणावावर मनोज जरांगेंना वेगळा संशय…

मराठा अन् धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का? असा थेट संशय अंजनगाव तणावावर मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे.

Untitle (27)

Untitle (27)

Manoj Jarnage : सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन दोन समाजात तणावाचं वातावरण झालंय. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन दोन गटात मागील दोन दिवसांपासून वाद सुरु आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलायं. या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage ) यांनी वेगळाच संशय व्यक्त केलायं. मराठा आणि धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतोयं का? असा काही डाव असू शकतो का? असा संशय जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलायं.

प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावानेही खाती उघडल्याचा संशय; अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, अंजनगावातील मराठा आणि धनगर बांधवांना आवाहन आहे की कुठल्यातरी नेत्यांच ऐकून कोणी भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करेल. नेत्याला याची गरज नसते, ते नेहमीच इकडे तिकडे पळत असतं. बोंबलण्याची त्याला ती सवय असते,अशीही टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केलीयं.

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन समाजांत मोठा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही समाज आमने-सामने येत दगडफेकीच्या घटना घडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.सध्या अंजनगाव येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर मृत्यूचा थरार! भरधाव ट्रकची भीषण धडक; सात कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

अंजनगाव खेलोबा येथील ज्या ठिकाणी महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ती जागा विशिष्ट समाजाच्या खेलोबा देवस्थानाची असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसऱ्या समाजाकडून ती जागा शासनाची असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूंची बैठक घेतली. संबंधित जागेची मोजणी करूनच पुतळ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठरवण्यात आले आहे.

Exit mobile version