Manoj Jarange बोलवता धनी कोण? हे शोधणे गरजेचे, आंदोलनावरून विखेंनी व्यक्त केला संशय

Manoj Jarange : सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात यावा यासाठी मराठा समाज ( Maratha Reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ( Manoj Jarange ) यातच सगे सोयऱ्याचा कायदा होत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मागणी आता सकल मराठा समाज करू लागला आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, समाज आता सरकारच्या बाजूने आहे. […]

Manoj Jarange बोलवता धनी कोण? आंदोलनावरून विखेंनी व्यक्त केला संशय

Manoj Jarange

Manoj Jarange : सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात यावा यासाठी मराठा समाज ( Maratha Reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ( Manoj Jarange ) यातच सगे सोयऱ्याचा कायदा होत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मागणी आता सकल मराठा समाज करू लागला आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, समाज आता सरकारच्या बाजूने आहे.

झिरो टू हिरो : आमदारकीचे तिकिट न मिळालेल्या तावडेंनी मोदींसह लोकसभेचे १९५ उमेदवार जाहीर केले…

मात्र मी म्हणजेच मराठा समाज असा काही लोकांचा समज झाला आहे. मी सांगेल ते सरकारने ऐकलं पाहिजे मी सांगेल ते मराठा समाज ऐकले पाहिजे असंच चालणार नाही. आज आरक्षणासाठी मराठा समाजाने मोठ्या कष्ट केला आहे. त्यामुळे यांचा बोलवता धनी कोण आहे? हे शोधणे गरजेचे आहे. धनंजय पाटलांना माझी सूचना आहे की, त्यांनी आता आंदोलन थांबवावं यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले.

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीत बंपर भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राचे नूतन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हस्ते संपन्न झाले. दरम्यान या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. मराठा आरक्षणावरून त्यांनी जरांगे यांना पुन्हा एकदा खोचक शाब्दिक टोला लगावला आहे तर विवेक कोल्हे यांच्या मोर्चावर देखील त्यांनी भाष्य केले.

मोर्चे काढा काही करा मी त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही…

ज्याने पूर्वक आम्हाला निधी कमी दिला जात असल्याचा आरोप करत विवेक कोल्हे यांनी शिर्डी मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. यावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले की मी त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही कोणाला काय मोर्चे काढायचे काय मागण्या करायच्या प्रत्येकाला येथे स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्यावरती मी काही भाष्य करणार नाही असे बोलत कोल्हे यांच्यावर बोलणं विखेंनी टाळलं.

Exit mobile version