नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीत बंपर भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीत बंपर भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

NALCO Recruitment 2024 : आज बरेच लोक नोकरीच्या (job) शोधात आहेत. मात्र, स्पर्धेच्या या युगात सरकारी नोकरी (Govt Job) मिळणे अवघड काम आहे. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (National Aluminum Company Limited) NALCO ने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार ‘पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी’ या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान, याच भरती प्रक्रियेविषयी जाणून घेऊ.

‘यूपी’त क्रॉस व्होटिंग! समाजवादीला फुटीचं ‘ग्रहण’, काँग्रेसलाही हादरे; राज्यसभा निवडणुकीची इनसाइड स्टोरी… 

भियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणीमध्ये म्हणजेच GATE 2023 मध्ये स्कोरअर केलेले पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. nalcoindia.com या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्जाची प्रक्रिया ४ मार्चपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल असेल.

रिक्त जागा आणि पदे:
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीच्या २७७ पदे भरण्यासाठी भरती मोहीम राबविली जात आहे.
मेकॅनिकल- 127 पदे.
इलेक्ट्रिकल- 100 पदे.
इन्स्ट्रुमेंटेशन- 20 पदे.
धातूशास्त्र- 10 पदे.
केमिकल- 13 पदे.
रसायनशास्त्र- 7 पदे.

BJP Candidates List 2024 मध्ये भोजपुरी स्टार्सचा बोलबाला; पाहा कुणा-कुणाला मिळाली संधी? 

वयोमर्यादा: या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षे असावे.

अर्ज फी:
ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज फी रुपये 500 आहे; तर विभागीय उमेदवारांसह इतर सर्व उमेदवारांसाठी रु.100.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची अंतिम निवड GATE 2023 मध्ये मिळालेल्या गुणांवर आणि वैयक्तिक मुलाखतीतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.

लिंक –https://mudira.nalcoindia.co.in/iorms/UploadData/Advertisement/638442872175902093_RECRUITMENT%20OF%20GRADUATE%20ENGINEER%20TRAINEES%20(GETs)%20THROUGHATE%20THROUGHATE-2020

सूचना-
उमदेवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करतांना उमेदवारांनी आपली अचूक माहिती भरावी.
अर्ज चुकल्यास किंवा उशीरा अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज फेटाळल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube