Rajya Sabha Election : सोनिया गांधीही परभूत होणार असा डाव भाजपनं खेळला!

Rajya Sabha Election : सोनिया गांधीही परभूत होणार असा डाव भाजपनं खेळला!

Rajya Sabha Election 2024  : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्या आधी नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगचा प्रकार उघडकीस आला. या निवडणुकांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका समाजवादीसह काँग्रेसलाही बसला. मात्र, आता लोकसभा निवडणुकांमध्ये  सोनिया गांधीही परभूत होतील असा डाव भाजपनं खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 रायबरेली-अमेठीत काँग्रेसला डोकेदुखी 

ज्येष्ठ पत्रकार लालमणी वर्मा यांच्या मते राज्यसभा निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका काँग्रेसलाही बसला आहे. रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ आहेत. आजही याच मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा आहे. 2022 च्या निवडणुकीत रायबरेली लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते. एक जागा भाजपकडे होती. अमेठी लोकसभा मतदारसंघात चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. या व्यतिरिक्त दोन मतदारसंघात विरोधी पक्षांचे आमदार आहेत. मात्र या यातील अमेठी विधानसभा मतदारसंघातील आमदाराने मतदानापासून दूर राहत एक प्रकारे भाजपालाच मदत केली.

भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी येथे आले होते. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद ओळखून समाजवादी पार्टीकडून उमेदवार दिले जात नसत. अशात रायबरेलीतील  उंचाहार मतदारसंघाचे आमदार आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मनोज पांडे यांनीही निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली. या घडामोडींचा फटका सपा-काँग्रेस आघाडीला आगामी निवडणुकीत बसेल असे लालमणी वर्मा सांगतात. एवढेच नव्हे तर, आगामी लोकसभेत सोनिया गांधीही परभूत होतील असा डाव भाजपनं खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्यसभेतील रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक (Rajya Sabha Election) झाली. या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवलं. भाजपाच्या यशाची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील आमदारांच्या क्रॉस व्होटिंगने ही निवडणूक गाजली. गोष्ट आहे याच निवडणुकीची. कारण, येथे भाजपाने आठवा उमेदवार रिंगणात उतरवला होता. भाजपाच्या या तिरक्या चालीमुळे विरोधकांची समीकरणे जुळून आली नाहीत. मतदान झालं. समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) काही आमदारांनी चक्क भाजपाच्या समर्थनार्थ क्रॉस व्होटिंग केलं. एक आमदार गैरहजर राहिला. या राजकारणाचा फटका समाजवादी पार्टीला बसला आणि एका उमेदवाराचा पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या आणखी एका आमदाराचं मत बाद झालं त्याचाही फायदा भाजपलाच मिळाला इतकेच नाही तर रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या (Congress) पारंपारिक मतदारसंघांनाही हादरे बसले.

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा पैकी आठ जागांवर भाजपाने उमेदवार दिले होते. या निवडणुकीत भाजपाचे सर्व आठ उमेदवार जिंकले. समाजवादी पार्टीने तीन उमेदवार दिले होते. त्यापैकी एकाचा पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग केल्यामुळे सपाचा उमेदवार पडला. समाजवादी पार्टीचे सात आमदार राकेश पांडे, राकेश प्रताप सिंह, अभिय सिंह, विनोद चतुर्वेदी, मनोज पांडे, पूजा पाल आणि आशुतोष मौर्य यांनी एनडीएला मतदान केलं. ही मते भाजप उमेदवार संजय सेठ यांना मिळाली. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांची पत्नी मतदानाला गैरहजर राहिल्या. तर एक आमदाराचं मत बाद झालं. त्यामुळे संजय सेठ यांना विजय मिळाला.

भाजपची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना घरी बसवले, नवीन चेहऱ्यांवर डाव

आता या निवडणुकीत नेमकं काय राजकारण झालं, समाजवादी पार्टीच्या काय चुका झाल्या याचा खुलासा ज्येष्ठ पत्रकार नदीम यांनी केला. त्यांच्या मते, निवडणुकीतील या राजकारणाची तयारी एक दिवसाची नक्कीच नव्हती. ज्या आमदारांनी पलटी मारून खेळ केला त्यात असेही काही आमदार होते जे फक्त नावालाच समाजवादी पार्टीत आहेत. मनोज पांडे वगळता अन्य आमदार समाजवादी पार्टीच्या ध्येय धोरणांशी फारसे जोडलेले कधीच नव्हते.

‘समाजवादी’च्या चुकांमुळे भाजपला फायदा 

या राजकारणाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले ते आमदार निवडणुकीच्या काळात पक्ष बदलण्यात माहीर आहेत. दुसरे म्हणजे समाजवादी पार्टीने उमेदवार निवडीत जर चूक केली नसती तर हा प्रकार घडलाच नसता. समाजवादी पार्टीने उमेदवारांच्या निवडीत चूक केली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. याचीच वाट पाहत असलेल्या भाजपाने अंदाज घेतला आणि आठवा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला. तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे समाजवादी पार्टीचे नेते डावपेच ओळखू शकले नाहीत. आमदार फुटणार हे माहिती असतानाही त्यांना असे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही, असे नदीम सांगतात.

नितीश म्हणाले, ‘अब इधर-उधर नही करेंगे… आप के साथ रहेंगे…’, पीएम मोदींना हसू अवरेना

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज