भाजपची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना घरी बसवले, नवीन चेहऱ्यांवर डाव

भाजपची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना घरी बसवले, नवीन चेहऱ्यांवर डाव

BJP Candidates List 2024: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने 195 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा वाराणसीतून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) गांधीनगरमधून आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लखनऊमधून निवडणूक लढवणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले आहे.

शिवराज चौहान आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना तिकीट
भाजपच्या यादीत शिवराज सिंह चौहान मध्यप्रदेशातील विदिशामधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया मैदानात उतरले आहेत. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापले
सर्वाधिक चर्चा भोपाळच्या जागेची होती. प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापून आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. प्रज्ञा ठाकूर या सध्या भोपाळमधून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा मोठ्या मतांनी पराभव केला.

Lok Sabha Election : भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला का वगळले?

डॉ. हर्षवर्धन आणि मीनाक्षी लेखी यांचा पत्ता कट
दिल्लीत लोकसभेच्या उमेदवारांच्या बाबतीत भाजपने मोठा बदल केला आहे. दिल्लीत अनेक बड्या चेहऱ्यांना घरी बसवण्यात आले आहे, तर बासुरी स्वराज, उद्योगपती खंडेलवाल यांच्यासारखे नवे चेहरे मैदानात उतरले आहेत. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपने सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तिकीट
भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत लोकसभा अध्यक्षांचेही नाव आहे. राजस्थानच्या कोटा-बुंदीमधून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. तर वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांना झालावाडमधून तिकीट देण्यात आले आहे.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : मोदी-शहा लोकसभेच्या रिंगणात

दोन मुस्लिम उमेदवार
भाजपच्या 195 उमेदवारांच्या यादीत केवळ 2 मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर मतदारसंघातून एक उमेदवार उभा करण्यात आला आहे. भाजपने सौमित्र खान यांना संधी दिली आहे.

तर केरळमधील मलप्पुरममधून डॉ. अब्दुल सलाम यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. अब्दुल सलाम यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेवर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादचे खासदार आहेत. ओवेसी यांच्या विरोधात भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. माधवी लता या विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. हैदराबादमध्ये डॉ. माधवी लता विरुद्ध असदुद्दीन ओवेसी अशी लढत देणार आहेत.

सुषमा स्वराज यांची कन्या लोकसभेच्या रिंगणात, नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज