सुषमा स्वराज यांची कन्या लोकसभेच्या रिंगणात, नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर

सुषमा स्वराज यांची कन्या लोकसभेच्या रिंगणात, नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत 34 मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पंतप्रधान मोदींना वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी ही उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त VVIP जागा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दोन वेळा या जागेवरून खासदार आहेत. आता तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. या जागेवर भाजपचे वर्चस्व आहे. मोदींच्या आधी मुरली मनोहर जोशी हे 2009 मध्ये भाजपचे खासदार झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये या जागेवरून पीएम मोदींना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान, दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी पाच जागांसाठी ज्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये नवी दिल्लीतून बन्सुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांना संधी देण्यात आली आहे. तर केवळ मनोज तिवारी यांना पुन्हा संधी दिली आहे. बन्सुरी या भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : मोदी-शहा लोकसभेच्या रिंगणात

बन्सुरी ह्या व्यवसायाने वकील आहे. 2019 मध्ये सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बन्सुरी यांनी सर्व अंत्यसंस्कार केले होते. बन्सुरी यांचा जन्म 1982 मध्ये दिल्लीत झाला. त्या अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली मते व्यक्त करत असतात. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या समर्थक आहेत.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : नितीन गडकरींना पहिल्या यादीतून डच्चू

मनोज तिवारी यांना उत्तर दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे. कमलजीत सेहरावत यांना पश्चिम दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे. तर भाजपने दक्षिण दिल्लीतून रामवीर सिंह बिधुरी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने नवी दिल्लीतून बन्सुरी स्वराज यांना तिकीट दिले आहे. प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून तिकीट देण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube