Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नावरून पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील कडव्या शब्दात टीका केली आहे.
Bharat vs India : ‘इंडिया’चं ‘भारत’ होणार का? युएनने सांगितले, प्रस्ताव आला तर नक्कीच…
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, राज्य सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न खरंच सोडवायचा असेल तर सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, या अधिवेशनात केंद्र सरकारला मराठा आरक्षणाबाबतचा ठराव पाठवून द्यावा आणि केंद्र सरकारने बोललेल्या विशेष अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो कायदा होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे यावेळी बोलताना पवार म्हणाले.
Jawan Leaked: किंग खानचा ‘जवान’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?
तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, मात्र कुणबी समाजाचे दाखले देण्याबाबतचा निर्णय हा फक्त काही ठराविक लोकांच्या बाबतीत असलेला प्रश्न सोडवू शकतो. मात्र इतर लोकांचा प्रश्न तसाच प्रलंबित राहील त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या (Maratha Reservation) तोंडाला पाने पुसू नये असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान सरकारने जीआर काढला, त्यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील’ असं म्हंटलं आहे. पण यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली. आंतरवाली सराटी येथील आंदोलन स्थळावरुन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.